ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 16:00 IST2025-08-13T15:55:04+5:302025-08-13T16:00:20+5:30

Hydrogen train india photos: पर्यावरण पूरक रेल्वेच्या दिशेने भारतीय रेल्वेने एक महत्त्वाचा टप्पा ओलांडला. हायड्रोजनवर चालणारे इंजिन तयार करण्यात आले असून, त्याची पहिली झलक रेल्वे मंत्रालयाकडून दाखवण्यात आली आहे.

भारताने रेल्वे विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा गाठला. रेल्वेने हायड्रोजन वायूवर चालणारे आणि पूर्णपणे पर्यावरणपूरक असलेले रेल्वे इंजिन विकसित केले आहे.

रेल्वे मंत्रालयाकडून भारतातील पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वे इंजिनचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या इंजिनची बांधणी वेगळ्या पद्धतीची असून, त्यातील आतील संरचनाही वेगळी आहे.

पर्यावरणाबद्दल सजगता वाढत असून, हायड्रोजन तंत्रज्ञान जगभरात अंगीकारले जात आहे. भारताने हायड्रोजनवर चालणारे रेल्वे इंजिन विकसित करून जागतिक पातळीवर पाचवा देश म्हणून स्थान मिळवले आहे.

जर्मनी, फ्रान्स, स्वीडन आणि चीनने रेल्वेसाठी हायड्रोजन तंत्रज्ञानाचा स्वीकार केलेला आहे. भारतातील पहिली हायड्रोजन इंजिन असलेली रेल्वे सेवा हरयाणात सुरू केली जाणार आहे. पहिली रेल्वे जिंद ते सोनीपत अशी धावणार आहे.

अलिकडेच रेल्वेने या इंजिनची यशस्वी चाचणी केली. हे इंजिन चेन्नईतील कारखान्यात तयार करण्यात आले आहे. ही रेल्वे जगातील सर्वात शक्तिशाली असणार आहे. ही रेल्वे २६०० प्रवासी घेऊन जाण्याची क्षमता असणार आहे.