'हे' आहेत जगातील अत्यंत महागडे स्मार्टफोन्स, किंमत ऐकून चक्रावाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 02:49 PM2018-10-22T14:49:12+5:302018-10-22T15:07:29+5:30

स्मार्टफोन हा जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. 1500 पासून अगदी सहज आता स्मार्टफोन उपलब्ध होतात. मात्र जगात अत्यंत महागडे स्मार्टफोन्सही आहेत. किंमत पाहून तुम्ही नक्कीच चक्रावून जालं. या स्मार्टफोनबाबत जाणून घेऊया.

Apple iPhone XS Max (512GB) हा भारतात लाँच केला जाणारा सर्वात महागडा आयफोन असणार आहे. या आयफोनची किंमत तब्बल 1,44,900 रुपये आहे.

Vertu Aster P Gold हा स्मार्टफोनची किंमत 5000 डॉलर्स म्हणजेच 3.79 लाखांपासून सुरू होते. मात्र गोल्ड प्लेटेड स्मार्टफोनची किंमत 14,146 डॉलर्स म्हणजेच जवळपास 10.4 लाख आहे.

Apple iPhone XS (512GB) हा भारतात लाँच केला जाणारा दुसरा महागडा आयफोन आहे. या आयफोनसाठी ग्राहकांना 1.35 लाख मोजावे लागणार आहेत.

Huawei Mate 20 RS Porsche Design या स्मार्टफोनची किंमत 2095 युरो म्हणजे जवळपास 1.77 लाख आहे.

Caviar iPhone XS Max या आयफोनच्या एकाबाजूला आकर्षक मेकॅनिकल वॉच आहे. गोल्ड आणि ब्लॅक व्हर्जनमध्ये उपलब्ध असून या फोनची किंमत 4.6 लाख आणि 5.26 लाख आहे.

The Diamond Crypto हा जगातील सर्वाच्च तंत्रज्ञानाने सज्ज असलेला फोन आहे. तब्बल 8 कोटी इतकी या फोनची किंमत आहे.

Savelli ही कंपनी जगातील सर्वात महागडे मोबाईल बनवणाऱ्या कंपनींपैकी एक आहे. Savelli Champagne Diamond या फोनची किंमत 39.36 लाख आहे.