मोबाईल पाहण्याची योग्य पद्धत कोणती, किती अंतर ठेवावं?; डोळ्यांवर होणार नाही वाईट परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2023 03:51 PM2023-06-03T15:51:08+5:302023-06-03T15:58:12+5:30

डोळे आणि मोबाईलमधील अंतर किती असावे आणि त्यामुळे त्याचा फारसा वाईट परिणाम होऊ नये, याची माहिती बहुतांश युजर्सना नसते.

स्मार्टफोनच्या सततच्या वापरामुळे डोळ्यांवर वाईट परिणाम होतो. हे माहीत असूनही लोक मोबाईलवर तासनतास घालवतात. गेम खेळण्यापासून ते चित्रपट पाहण्यापर्यंत, वापरकर्ते त्यांच्या स्मार्टफोनवर प्रत्येक छंद पूर्ण करतात, परंतु ते त्यांच्या आरोग्याचं बरच नुकसान करतात.

डोळे आणि मोबाईलमधील अंतर किती असावे आणि त्यामुळे त्याचा फारसा वाईट परिणाम होऊ नये, याची माहिती बहुतांश युजर्सना नसते. जगात स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या अब्जावधीत आहे आणि ती सातत्याने वाढत आहे.

अनेक रिपोर्ट्समध्ये असे सांगण्यात आले आहे की, दररोज सरासरी लोक त्यांच्या स्मार्टफोनवर साडेतीन तास घालवतात. अशा स्थितीत त्याचा डोळ्यांवर वाईट परिणाम होणे स्वाभाविक आहे.

स्मार्टफोनच्या वाढत्या वापरानंतर डोळ्यांना त्यामुळे होणाऱ्या हानीपासून वाचवण्याची गरज आता पूर्वीपेक्षा जास्त झाली आहे. म्हणूनच डोळा आणि स्मार्टफोनमधील अंतर किती असावे हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

तुमच्या स्मार्टफोनकडे जास्त वेळ पाहिल्याने थकवा, डोळ्यांना खाज सुटणे आणि कोरडेपणा, अंधुक दृष्टी आणि डोकेदुखी यांसारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात. स्मार्टफोनच्या वापरामुळे होणार्‍या डोळ्यांच्या समस्या दीर्घकाळापर्यंत समस्या निर्माण करू शकतात.

प्रसाद नेत्रालयाच्या एका रिपोर्टनुसार, स्मार्टफोनमधून निघणारा निळा प्रकाश डोळ्यांसाठी आणि रेटिनासाठी धोकादायक ठरू शकतो कारण तो कॉर्निया आणि लेन्सने ब्लॉक केलेला नाही, त्यामुळे तो खूप हानिकारक आहे.

स्मार्टफोन वापरताना बहुतेक युजर्स ते त्यांच्या चेहऱ्यापासून सुमारे 8 इंच अंतरावर ठेवतात. असे अजिबात करू नये, कारण फोन इतका जवळ ठेवल्याने डोळ्यांना खूप नुकसान होऊ शकतं. तुमचे डोळे दीर्घकाळ स्मार्टफोन वापरण्यापासून वाचवण्यासाठी सुमारे 16 ते 18 इंच अंतर ठेवा.

जर तुम्ही तुमचा स्मार्टफोन सतत वापरत असाल तर ते पाहताना एकदातरी डोळ्याची उघडझाप करायला विसरू नका. यामुळे डोळ्यातील ओलावा कायम राहील. 15 मिनिटांत सुमारे 10 वेळा डोळ्यांची उघडझाप योग्य मानली जाते

20-20-20 चे अनुसरण करण्याचे सुनिश्चित करा. या नियमानुसार, दर 20 मिनिटांनी, 20 सेकंदांसाठी, तुमच्या स्क्रीनपासून 20 फूट दूर असलेल्या वस्तूकडे पाहा. यामुळे डोळ्यांना विश्रांती मिळते.

मोबाईलची ब्राइटनेस अ‍ॅडजस्ट करत राहा आणि तुमच्या स्क्रीनची ब्राइटनेस तुम्ही जिथे आहात तितकीच आहे याची खात्री करा. खूप चकाकणारा किंवा खूप डार्क स्क्रीनचा तुमच्या डोळ्यांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

अनेकदा अंधाऱ्या खोलीत प्रकाश नसतानाही अनेकजण स्मार्टफोनचा वापर करतात, पण ते तुमच्या डोळ्यांसाठी खूप हानिकारक ठरू शकते. हे टाळण्याचा उत्तम उपाय म्हणजे मोबाईलची ब्राइटनेस लेव्हल शक्य तितकी कमी ठेवणे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.