तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स फोनमध्ये सेव्ह करा, चलन कापले जाणार नाही; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 01:09 PM2021-08-26T13:09:06+5:302021-08-26T13:27:17+5:30

driving licence : ड्रायव्हिंग लायसन्सची हार्ड कॉपी सतत स्वत:जवळ ठेवण्याऐवजी तुम्ही त्याची सॉफ्ट कॉपी तुमच्या फोनवर डाऊनलोड करून ठेवू शकता.

गाडी चालविण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स असणे खूप महत्वाचे आहे. या ड्रायव्हिंग लायसन्सची हार्ड कॉपी सतत स्वत:जवळ ठेवण्याऐवजी तुम्ही त्याची सॉफ्ट कॉपी तुमच्या फोनवर डाऊनलोड करून ठेवू शकता. यासाठी DigiLocker किंवा mParivahan अॅपची मदत घेऊ शकता.

मोबाइलवर ड्रायव्हिंग लायसन्स डाउनलोड करणे अगदी सोपे आहे. मोबाइलमध्ये ड्रायव्हिंग लायसन्सची सॉफ्ट कॉपी DigiLocker किंवा mParivahan अॅपमध्ये ठेवली तर तुमचे चलन सुद्धा कापले जाणार नाही.

तुमच्या मोबाइलवर ड्रायव्हिंग लायसन्सची सॉफ्ट कॉपी असणे, म्हणजे तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स विसरले असण्याची भीती देखील राहणार नाही. 2018 मध्ये सरकारने एक सूचना जारी केली होती की, DigiLocker किंवा mParivahan अॅपवरून देखील गरज पडल्यास ड्रायव्हिंग लायसन्स दाखवले जाऊ शकते.

त्यामुळे तुम्ही आपल्या फोनवर ड्रायव्हिंग लायसन्सची सॉफ्ट कॉपी डाऊनलोड करु शकता आणि आवश्यकतेसाठी ती दाखवू शकता. यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. यासाठी तुमचे DigiLocker वर अकाउंट असणे आवश्यक आहे

तुम्ही DigiLocker साठी आपला फोन नंबर आणि आधार कार्डसह साइन अप करू शकता. यासाठी igiLocker अॅप किंवा साइटवर जा आणि युजर्सचे नाव आणि सहा अंकी पिनसह साइन इन करा. त्यानंतर तुम्हाला आपल्या रजिस्टर्ड फोनवर वन टाइम पासवर्ड (ओटीपी) मिळेल.

याठिकाणी सर्च बारमध्ये तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स पाहावे लागेल. त्यानंतर तुम्हाला ज्या राज्यातून ड्रायव्हिंग लायसन्स मिळाले, ते राज्य सिलेक्ट करावे लागेल. तसेच, याठिकाणी तुम्हाला लायसन्स नंबर अपलोड केल्यानंतर Get Document बटण क्लिक करावे लागेल.

DigiLocker मधील Issued Documents लिस्टमध्ये जाऊन तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स पाहू शकता. याची सॉफ्ट कॉपी पीडीएफ बटणावर क्लिक करून डाउनलोड देखील केली जाऊ शकते.

तसेच, तुम्ही DigiLocker फोनवर ड्रायव्हिंग लायसन्स डाउनलोड करून सेव्ह करु शकता. याशिवाय, तु्ही mParivahan अॅप डाउनलोड करू शकता आणि ड्रायव्हिंग लायसन्स सेव्ह करु शकता.

Read in English