Google I/O 2019 : गुगल उद्या मोठी घोषणा करणार; स्वस्तातील Pixel 3a च्या लाँचिंगची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 12:52 IST2019-05-06T14:45:52+5:302019-05-07T12:52:14+5:30

इंटरनेट क्षेत्रातील मायाजाल समजली जाणाऱ्या गुगलने अवघे जग व्यापले आहे. अँड्रॉईडमुळे प्रत्येकाच्या हातात गुगल जाऊन पोहोचली आहे. याच गुगलच्या वार्षिक इव्हेंटमध्ये कंपनीची नवनवीन उत्पादने लाँच केली जातात. उद्या Google I/O 2019 या बहुप्रतिक्षित इव्हेंटची सुरुवात होत आहे. गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई काही मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे. यामध्ये नवीन ऑपरेटिंग सिस्टिम Android Q, Pixel 3a ही स्वस्तातली मोबाईल सिरिज यांचा समावेश असणार आहे.
काही दिवसांपूर्वी फेसबुकच्या मार्क झकरबर्ग यांनी डेव्हलपर्स कॉफ्रेंस F8 मध्ये सुरक्षेवर लक्ष्य केंद्रीत केल्याचे म्हटले होते. गुगलही यावेळी खासगीपणा आणि सुरक्षेवर लक्ष केंद्रीत करेल. तसेच आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि मशिन लर्निंगला आणखी चांगले बनविण्यावर लक्ष दिले जाऊ शकते.
गुगलच्या पिक्सल श्रेणीतील फोन खुपच महागडे आहेत. यामुळे त्यांची विक्रीही मंदावली आहे. सामान्यांच्या खिशात बसणारे फोन Pixel 3a आणि 3a XL लाँच होण्याची शक्यता आहे. भारतातील ई-कॉमर्स वेबसाइटवर याबाबतचा टीझर लाँच झाला आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून Pixel 3a आणि 3a XL चे फोटो आणि फिचर्स लीक होत आहेत. या फोनची किंमत सामान्य ग्राहकांना परवडणारी नसली तरीही पिक्सलपेक्षा कमीच असणार आहे.
Pixel 3a आणि 3a XL
गुगलच्या पिक्सल श्रेणीतील फोन खुपच महागडे आहेत. यामुळे त्यांची विक्रीही मंदावली आहे. सामान्यांच्या खिशात बसणारे फोन Pixel 3a आणि 3a XL लाँच होण्याची शक्यता आहे. भारतातील ई-कॉमर्स वेबसाइटवर याबाबतचा टीझर लाँच झाला आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून Pixel 3a आणि 3a XL चे फोटो आणि फिचर्स लीक होत आहेत. या फोनची किंमत 35 हजार ते 50 हजारच्या आसपास असण्याची शक्यता आहे.
Android TV आणि Google Maps
गुगल गेल्या वर्षीच लाँच केलेल्या Android TV मध्ये फारकाही बदल करणार नाही. मात्र, गुगल मॅप्समध्ये बदल होऊ शकतात. नुकतेच अॅक्सिडेंट रिपोर्ट फिचर अॅड करण्यात आले होते. याशिवाय ट्रॅफिक जामसह अन्य काही फिचर्स मिळण्य़ाची शक्यता आहे.
Android Q
गुगलने गेल्यावर्षी अँड्रॉईड पाय ही ऑपरेटिंग सिस्टिम लाँच केली होती. आता Android Q ही ऑपरेटिंग सिस्टिम येऊ घातलेली आहे, या इव्हेंटमध्ये ही ऑपरेटिंग सिस्टिम पाहायला मिळेल. गेल्यावर्षी Android 9 Pie चा प्रिव्ह्यू दाखविण्यात आला होता. यंदा Android Q चे दोन बीटा व्हर्जन लाँच केले आहेत. यानुसार प्रायव्हसी कंट्रोल, डार्क मोड, कलर थिमिंग सारखे ऑप्शन मिळू शकणार आहेत.