लै भारी! 35 हजारांच्या डिस्काउंटसह स्मार्टफोन घेण्याची शेवटची संधी, पुन्हा मिळणार नाही अशी ऑफर

By सिद्धेश जाधव | Published: December 28, 2021 06:32 PM2021-12-28T18:32:45+5:302021-12-28T18:44:11+5:30

2021 चे शेवटचे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. Amazon इंडिया अनेक प्रोडक्ट्सवर भरघोस डिस्काउंट देत आहे. या सेल अंतर्गत Xiaomi, Samsung, Redmi, iQOO सारख्या ब्रँड्सचे स्मार्टफोन स्वस्तात विकत घेता येत आहेत.

यातील काही स्मार्टफोनवर 35,000 रुपयांपेक्षा जास्त डिस्काउंट मिळत आहे. 25 डिसेंबरला सुरु झालेला हा सेल 31 डिसेंबरपर्यंत सुरु राहील. किंमतीवर मिळणाऱ्या डिस्काउंटसह या सेलमध्ये 1,500 पर्यंतची सूट अ‍ॅमेझॉन पे आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड धारकांना मिळेल.

iQOO Z3 अ‍ॅमेझॉन सेलमध्ये फक्त 15,490 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा फोन 3,000 रुपयांच्या डिस्काउंट कुपन आणि बँक ऑफर नंतर या किंमतीत विकत घेता येईल.

Redmi Note 10S ची खरेदी करण्यासाठी ICICI बँक क्रेडिट कार्डचा वापर केल्यास हजार रुपये वाचतील. हा फोन अ‍ॅमेझॉनच्या सेलमध्ये 14,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. सोबत ऑन-एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे.

अ‍ॅमेझॉन सेलमध्ये सॅमसंग गॅलेक्सी M52 5G चा 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट 29,000 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा फोन ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डवर विकत घेतल्यास 3000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल.

Xiaomi 11 Lite NE 5G स्मार्टफोन तुम्ही 24,500 मध्ये विकत घेऊ शकता. तसेच आयसीआयसीआय बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या माध्यमातून यावर 2,500 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट मिळेल. जुना फोन देऊन या डिवाइसची किंमत 19,950 रुपयांनी कमी करता येईल. शाओमीचे Mi 11X Pro, Mi 11X देखील 2,500 रुपयांच्या डिस्काउंटसह विकत घेता येतील.

74,990 रुपयांचा हा फोन अ‍ॅमेझॉन इयर एन्ड सेलमध्ये 39,990 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. यावर 35,000 रुपयांची सूट मिळत आहे, जी Amazon Pay ICICI क्रेडिट कार्डने अजून 1,500 रुपयांनी वाढवता येईल. म्हणजे हा फोन 38,490 मध्ये विकत घेता येईल.