डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 15:40 IST2025-04-22T15:07:34+5:302025-04-22T15:40:53+5:30
सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणात रोज नवीन खुलासे होत आहेत.

सोलापूरमधील प्रख्यात डॉक्टर शिरीश वळसंगकर यांनी स्वत:वर गोळी झाडून घेत जीवन संपवलं होतं. या घटनेमुळे सोलापूरसह राज्यसभरात खळबळ उडाली होती.
आता या प्रकरणी वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं असून, डॉ. वळसंगकर यांची एक सुसाईड नोट सापडल्यानंतर वळसंगकर यांच्या रुग्णालयात अधिकारी असलेल्या मनीषा मुसळे माने या महिलेला अटकही करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. आज डॉ. वळसंगकर यांचा मुलगा डॉ. आश्विन आणि सून डॉ. सोनाली यांचा पोलिसांनी जबाब घेतला. पोलिस आता रुग्णालयातील इतर काही कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवणार आहेत.
तर दुसरीकडे मनीषा मुसळे- माने यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्यांचीही चौकशी सुरू केली आहे.
डॉ. शिरीष वळसंगकर यांनी काही वर्षांपूर्वीच आपल्या हॉस्पिटलची पूर्ण जबाबदारी मुलगा डॉ. आश्विन आणि सून सोनाली यांच्यावर सोपवली होती. तर हॉस्पिटलमधील संपूर्ण कारभार या प्रशासकीय अधिकारी म्हणून मनीषा मुसळे-माने पाहत होत्या.
काही दिवसापासून रुग्णालयातील रुग्णांचा उपचार आणि प्रशासकीय कामामुळे ताण वाढला होता. यामुळे डॉ.शिरीष वळसंगकर यांनी पुन्हा एकदा रुग्णालयातील कामावर लक्ष घातले होते.
डॉ. वळसंगकर यांनी रुग्णालयाची सर्व सूत्र हाती घेतल्यानंतर मनीषा मुसळे -माने हिच्याविरोधात गैरव्यवहाराच्या तक्रारी आल्या होत्या.
यामुळे मुसळे-माने हिचे सर्व अधिकार कमी केले होते. यामुळेच डॉ. वळसंगकर आणि मुसळे-माने यांच्यात वाद सुरू होते. माने हिने मेल लिहित आत्महत्या करण्याची धमकी दिली होती.
दरम्यान, डॉ. वळसंगकर यांनी संपत्तीची वाटणी काही महिन्या आधीच केल्याची माहिती समोर आली आहे. काही महिन्याआधीच त्यांनी मृत्यूपत्र तयार केले होते.