Atharva Sudame: पुण्याचा रीलस्टार ते थेट राज ठाकरेंशी मैत्री; कोण आहे अथर्व सुदामे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 15:04 IST2025-08-26T14:36:55+5:302025-08-26T15:04:50+5:30
Who is Atharva Sudame: एका व्हिडीओमुळे ट्रोल झालेला अथर्व सुदामे नक्की कोण आहे? चला जाणून घेऊया

ऐन गणेशोत्सवात केलेल्या एका व्हिडीओमुळे रीलस्टार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे चर्चेत आला आहे. या व्हिडीओत एका मूर्तिकाराकडे अथर्व सुदामे गणपतीची मूर्ती खरेदी करण्यासाठी जात असल्याचं दाखवलं गेलं होतं.
पण नंतर तो मूर्तीकार मुस्लीम असल्याचं समजतं. तो मूर्तीकार अथर्वला दुसऱ्या मूर्तीकाराकडून मूर्ती खरेदी करण्याचा सल्ला देतो. पण, अथर्व त्याच्याकडूनच मूर्ती खरेदी करतो.
तो म्हणतो, "माझे वडील सांगतात की, आपण साखर व्हावं जी खीरही बनवते आणि शीर खुरमाही. तसेच आपण वीट व्हावं जी वीट देवाळातही लावली जाते आणि मशिदीमध्ये देखील.
या रीलवरुन अथर्व सुदामेवर टीका होत आहे. नव्या वादाला तोंड फुटलं आहे. या रीलमुळे अथर्व सुदामेला ट्रोल केलं जात आहे.
अथर्वने हा व्हिडीओ डिलीट करून चाहत्यांची माफीही मागितली आहे. एका व्हिडीओमुळे ट्रोल झालेला अथर्व सुदामे नक्की कोण आहे? चला जाणून घेऊया
Who is Atharva Sudame
अथर्व सुदामे हा मुळचा पुण्याचा आहे. सोशल मीडियावर रील्स बनवून त्याने प्रसिद्धी मिळवली.
त्याचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. इन्स्टाग्रामवर अथर्वचे १.७ मिलियन फॉलोवर्स आहेत. तर युट्यूबवर १.३२ मिलियन सबस्क्रायबर्स आहेत.
अथर्वच्या शिक्षणाबद्दल सांगायचं झालं तर त्याने कॉमर्समधून पदवी पर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. अभिनयाची आवड म्हणून त्याने रील्स बनवायला सुरुवात केली होती.
याच रील्समुळे त्याला प्रसिद्धी मिळाली. अनेक सेलिब्रिटींसोबतही त्याने रील्स व्हिडीओ बनवले आहेत. पण, आता त्याच रील्समुळे त्याला ट्रोलिंगला सामोरं जावं लागत आहे.
अथर्व सुदामेचं राज ठाकरेंनी कौतुकही केलं होतं. राज ठाकरेंच्या मनसेशी त्याचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत.