Shantanu Naidu: रतन टाटांचा तरुण सहकारी राहिलेल्या शंतनू नायडूने प्रेमाची कबुली दिली? तिच्यासोबतचे फोटो आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 10:10 IST2025-09-09T10:05:02+5:302025-09-09T10:10:27+5:30
Who is Shantanu Naidu's Girlfriend: Shantanu Naidu Love Story: दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांच्या जवळचा तरुण सहकारी राहिलेले शंतनू नायडू सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात. त्याने आता एक पोस्ट शेअर केली आहे.

Shantanu Naidu Love Story: दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांच्या जवळचा तरुण सहकारी राहिलेले शंतनू नायडू चर्चेत असतात. आता ते त्यांच्या सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे चर्चेत आले आहेत. नायडू यांनी इन्स्टाग्रामवर एका तरुणीसोबत फोटो पोस्ट केला आहे. या फोटोंनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
शंतनू नायडू यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये तरुणीचा चेहरा दिसत नाही. या खास फोटोंची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू झाली आहे. या फोटोवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.
शंतनू नायडू याने या पोस्टला एक कॅप्शन दिली. ही खास पोस्ट शेअर करुन शंतनूने तरुणीसोबतच्या नात्याची कबुली दिल्याचे दिसत आहे. "Our souls didn't meet, they remembered" अशी कॅप्शन त्या पोस्टवर दिली आहे.
या पोस्टमधील फोटोमध्ये शंतनू नायडूने त्या तरुणीचे चेहरा दाखवणे टाळले आहे. या पोस्टमध्ये त्याने तिचे नावही टाळले आहे.
यामुळे शंतनूची गर्लफ्रेंड नेमकी कोण आहे, ती काय करते. या दोघांची लव्ह स्टोरी कशी सुरू झाली याबाबत चर्चा सुरू आहेत.
शंतनू नायडू हे रतन टाटा यांचे तरुण आणि सर्वात जवळचे सहकारी होते. त्यांनी मोटॉपॉझ या सामाजिक उपक्रमाद्वारे टाटांचे लक्ष वेधून घेतले.
रतन टाटा यांनी शंतनू यांना कॉर्नेल विद्यापीठात एमबीएचे शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत केली.
रतन टाटा यांच्या निधनानंतर, शंतनू नायडू यांना टाटा मोटर्समध्ये महाव्यवस्थापक आणि धोरणात्मक उपक्रमांचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
शंतनू नायडू यांनी 'बुकीज' नावाचा एक अनोखा वाचन उपक्रम सुरू केला आहे, या माध्यमातून अनेक जण सार्वजनिक ठिकाणी शांतपणे वाचण्यासाठी एकत्र येतात.