By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 13:46 IST
1 / 12Harish Rana Viral Video: गेल्या १३ वर्षांपासून कोमात असलेल्या आणि मृत्यूशी झुंज देणाऱ्या ३२ वर्षीय हरीश राणाचा आयुष्याचा प्रवास आता एका अत्यंत भावूक वळणावर येऊन पोहोचला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक आदेशानंतर दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांच्या 'इच्छा मृत्यू'ची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली आहे. 2 / 12हरीशचा आता व्हेंटिलेटर सपोर्ट काढून टाकण्यात आला आहे. तसेच त्याला सामान्य बेडवर हलवण्यात आले आहे. एम्समधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हेंटिलेटर काढल्यानंतर आता हरीश राणाची प्रकृती सध्या स्थिर आहे. लक्ष ठेवण्यासाठी १० तज्ज्ञ डॉक्टरांचे एक विशेष मेडिकल बोर्ड नियुक्त करण्यात आले आहे.3 / 12या प्रक्रियेचा भाग म्हणून काही दिवसांपूर्वीच पोटातील अन्नाची नळी बंद करण्यात आली होती. आता त्यांना वेंटिलेटर आणि इतर लाईफ सपोर्ट सिस्टिमवरूनही दूर करण्यात आले आहे. मात्र, वैद्यकीय प्रोटोकॉलनुसार त्यांना मेंदूसाठी आवश्यक असलेली काही औषधे अजूनही दिली जात आहेत.4 / 12हरीश राणा याच्या कुटुंबाची स्थिती अतिशय हळवी झाली आहे. दिवसेंदिवस हे दुःख वाढत चालले आहे. अलीकडेच ब्रह्मकुमारी संस्थेच्या साधक दीदी हरीशशी अखेरचा संवाद साधत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. तो व्हिडिओ पाहताच संपूर्ण देश शोकाकूल झाला. अशा प्रकारे हरीशचा अनंताचा प्रवास सुरू झाल्याचे देशवासीयांना दुःख झाले आहे. 5 / 12ब्रह्मकुमारी साधिका भगिनी कुमारी लवली यांनी हरीशशी संवाद साधला. भगिनी कुमारी लवली यांनी हरीश राणाच्या मस्तकावर चंदनाचा टिळा लावला. त्याच्या शेजारी उभ्या राहिल्या. प्रार्थना केली आणि शांत आवाजात अखेरचा संवाद साधला. तेव्हा त्या संवादाला हरीशने प्रतिसाद दिला, असे व्हिडिओत दिसत आहे. पहिल्या सात सेकंदांसाठी भगिनी लवली आपला एक हात हरीशच्या डोक्यावर ठेवून फक्त त्याच्याकडे बघत राहते आणि स्मित हास्य करताना दिसत आहे.6 / 12हरीशचे दोन्ही डोळे उघडे आहेत. त्याच्या पापण्यांची हालचाल होत आहे. त्याचे तोंड उघडे आहे. अधूनमधून, जणू काही त्याला तहान लागली आहे, अशा प्रकारे तो श्वास घेताना दिसत आहे. भगिनी लवलीने तिचा पहिला शब्द उच्चारताच, हरीशचे डोळे अचानक हलतात आणि तो थेट तिच्याकडे पाहण्यासाठी वळतो. 7 / 12सात सेकंदांच्या शांततेनंतर भगिनी लवली या ज्याप्रकारे तिचा पहिला शब्द उच्चारतात आणि तो ऐकून हरीश ज्याप्रकारे आपले डोळे फिरवतो, त्यावरून हे स्पष्टपणे दिसून येते की, तो ऐकू शकतो. कदाचित तो ऐकत होता. कुणास ठाऊक, भगिनी लवली दीदी या काय म्हणत होत्या, हे त्याला समजतही असेल. जर हरीश खरोखरच ऐकत आणि समजत असेल, तर त्याला हे नक्कीच कळले असेल की त्याचा मृत्यू जवळ आला आहे.8 / 12सगळ्यांना माफ करत आणि सर्वांची माफी मागत जा हरीश... आता तुझ्या वेदनांचे फक्त काही क्षण उरले आहेत, या अत्यंत भावूक शब्दांत ब्रह्माकुमारी भगिनींनी हरीश राणा याला अखेरचा निरोप दिला. आता जा, सर्वांना क्षमा करा आणि सर्वांची माफी माग. हे शब्द ऐकून लोकांच्या डोळ्यात पाणी येत आहे. कमी कालावधीत व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. 9 / 12प्रिय हरीश, तू बोलू शकत नव्हतास की हसू शकत नव्हतास, पण तरीही तुझ्या आई-वडिलांसाठी तूच सर्वकाही होतास. आता तुझी या कष्टातून सुटका होण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत त्यांनी हरीशला निरोप दिला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून अनेकांचे डोळे पाणावले आहेत.10 / 12हरीशचे कुटुंब गेल्या दोन दशकांपासून ब्रह्मकुमारी केंद्राशी जोडलेले आहे. तो दवाखान्यात रवाना होण्यापूर्वी मोहन नगर येथील ब्रह्मकुमारी केंद्राच्या संचालिका बीके लवली दीदी आणि इतर भगिनींनी त्याच्या राजनगर एक्सटेंशन येथील घरी जाऊन निरोप दिला.11 / 12अपघातानंतर हरीश कोमात गेला. तेव्हा कुटुंबाने आध्यात्मिक आधारासाठी ब्रह्मकुमारी केंद्राशी जोडले गेले. गेल्या काही वर्षांत, ब्रह्मकुमारी केंद्राशी संबंधित अनेक लोक वेळोवेळी राणा कुटुंबाला भेट देत आहेत. त्यांच्यासोबत प्रार्थना करत आहेत, मानसिक आधार देत आहेत.12 / 12हरीश यांचा हा दुर्दैवी प्रवास २०१३ मध्ये सुरू झाला होता. चंदीगड युनिव्हर्सिटीतून बी.टेक करत असलेले हरीश रक्षाबंधाच्या दिवशी आपल्या बहिणीशी फोनवर बोलत होते. त्याच वेळी पीजीच्या चौथ्या मजल्यावरून पडून त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. तेव्हापासून गेली १३ वर्षे ते हालचालही करू शकत नव्हते. त्यांचे हात-पाय पूर्णपणे निकामी झाले होते. कुटुंबाने शक्य ते सर्व उपचार केले, पण यश आले नाही. अखेर थकलेल्या कुटुंबाने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आणि त्यांना इच्छा मृत्यूची परवानगी मिळाली.