Amit Thackeray Udayanraje Bhosale: मनसेचे अमित राज ठाकरे साताऱ्यात उदयनराजे भोसलेंच्या भेटीला, काय असेल कारण? पाहा Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 01:34 PM2023-01-29T13:34:32+5:302023-01-29T13:53:37+5:30

दोघांमध्ये विविध विषयांवर झाली सविस्तर चर्चा

Amit Thackeray Udayanraje Bhonsle: पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या मनविसे अध्यक्ष अमित राज ठाकरे ह्यांनी साताऱ्यात खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली.

या भेटीदरम्यान छत्रपती घराणे आणि ठाकरे कुटुंबायांतील ऋणानुबंध अनुभवता आला तसंच विविध विषयांवर दोघांमध्ये दिलखुलास चर्चा झाली, अशा कॅप्शनसह एक व्हिडीओ मनसेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे.

मनसे नेते आणि विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेस निवासस्थानी भेट घेतली.

अमित ठाकरे सातारा दौऱ्यावर विद्यार्थी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. साताऱ्यात पक्षाची मोर्चेबांधणी करण्यासाठी विशेषतः हा अमित ठाकरे यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

अमित ठाकरे हे सध्या त्यांच्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. अमित ठाकरे आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यात या भेटीदरम्यान विविध विषयांवर चर्चा झाली.

सध्या मनसे नेते अमित राज ठाकरे यांचे महासंपर्क अभियान राज्यात सुरु आहे. यानिमित्त अमित ठाकरे सातारा येथे आले आहेत. साताऱ्यात अमित ठाकरे आले असता त्यांनी फटाक्यांची आतषबाजी झाली. कंदी पेढ्यांचा हार, औक्षण असे स्वागत झाले. यावेळी उदयनराजे यांनी अमित ठाकरे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.