बारीक व्हायचंय-डाएट जमत नाही? १ चमचा 'या' बीया खा, भराभर घटेल वजन-वितळेल चरबी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 20:23 IST2026-01-14T20:14:17+5:302026-01-14T20:23:17+5:30

Which Seeds To Eat To Lose Weight : याव्यतिरिक्त भोपळ्याच्या बियांमध्ये व्हिटामीन बी-कॉम्पलेक्स, व्हिटामीन के आणि व्हिटामीन ई सुद्धा असते.

भोपळ्याच्या बीया प्रोटीन, फायबर्स, मॅग्नेशियम, जिंक, आयर्न, फॉस्फरस आणि मॅग्ननीज तसंच एंटी ऑक्सिडेंट्ससोबत इतर पोषक तत्वांचे प्रमाण जास्त असते. (Which Seeds To Eat To Lose Weight)

याव्यतिरिक्त भोपळ्याच्या बियांमध्ये व्हिटामीन बी-कॉम्पलेक्स, व्हिटामीन के आणि व्हिटामीन ई सुद्धा असते.

भोपळ्याच्या बीयांमध्ये प्रोटीन्स आणि फायबर्सचे प्रमाण जास्त असते. तसंच या बियांच्या सेवनानं दीर्घकाळ पोट भरलेलं राहते तसंच ओव्हरइटींग टाळता येते.

ओव्हरइटींगपासून बचावासाठी पोषक तत्वांची आवश्यकता असते. हेल्थ एक्सपर्ट्च्यामते एका दिवसाता १ ते २ चमचे भोपळ्याच्या बियांचे सेवन तुम्ही करू शकता.

भोपळ्याच्या बियांमध्ये हेल्दी फॅट्स असतात ते शरीराची मेटाबॉलिझ्म वेगानं करण्यास मदत करतात. कॅलरीज बर्न करण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

भोपळ्याच्या बीया तुम्ही रिकाम्या पोटी खाऊ शकता. भोपळ्याच्या बीया रिकाम्यापोटी स्नॅक्सच्या स्वरूपात खाऊ शकता.

भोपळ्याच्या बिया सॅलेड किंवा दही किंवा स्मूदी किंवा खिचडीत मिसळून खाऊ शकता. तर काही लोक भोपळ्याच्या बिया पाण्यात मिसळून खातात.

भोपळ्याच्या बियांचा योग्य प्रमाणात आपल्या आहारात समावेश करा. हेल्थ एक्सपर्ट्सच्यामते भोपळ्याच्या बियांचा आहारात समावेश नेहमीच करायला हवा. पण २० ते ३० ग्रॅम पेक्षा जास्त बियांचा समावेश करू नका.