तुम्ही डाव्या कुशीवर झोपता की उजव्या? झोपेची पोझिशन सांगते तुमचा स्वभाव आणि आरोग्याचीही स्थिती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2025 20:10 IST2025-08-05T20:00:30+5:302025-08-05T20:10:01+5:30

What Your Sleep Position Says About Your Health : sleep position and health : what your sleep posture reveals : health effects of sleep positions : sleeping posture and health connection : आरोग्याचा आणि उत्तम झोपेचा फार संबंध असतो, हे विसरु नकाच.

आपल्या सगळ्यांनाच दररोज ६ ते ८ तासांच्या झोपेची आवश्यकता असते. झोपेसोबतच (What Your Sleep Position Says About Your Health) आपल्या झोपण्याची स्थिती नेमकी कशी व कोणत्या पद्धतीची आहे ते देखील तितकेच महत्वाचे असते.

खरंतर, आपल्या झोपेची स्थिती फक्त आरामदायक नसून, ती आपल्या शरीराच्या (sleep position and health) आरोग्यावर देखील खोलवर परिणाम करते. संशोधन असं सांगतं की, आपल्या झोपेची पोझिशन आपल्या मानसिक, भावनिक आणि शारीरिक आरोग्याविषयी बरेच काही सांगते.

कुणी पाठीवर झोपतं तर कुणी पोटावर, तर कुणी कुशीत वळून. पण या सगळ्या (sleeping posture and health connection) झोपेच्या सवयींमध्ये दडलेलं असतं आपल्या आरोग्याचं गुपित! विविध झोपेच्या पोझिशनचा आपल्या आरोग्याशी नेमका काय संबंध आहे ते पाहूयात...

जर तुम्ही कुशीत वळून, दोन्ही पाय पोटाकडे ओढून झोपत असाल, तर याचा अर्थ तुमचं भावनिक स्वास्थ्य थोडं नाजूक असू शकतं. मात्र ही झोपेची स्थिती घोरणं कमी करण्यात मदत करते आणि पाठदुखीसाठी देखील फायदेशीर ठरते.

जर तुम्ही सरळ कुशीवर झोपत असाल, तर तुम्ही वागायला - बोलायला अगदी सहजसोपे आहात. या झोपेच्या स्थितीमुळे मणक्याची (spine) स्थिती योग्य राहते आणि पाठीच्या आरोग्यासाठी अशा पोझिशनमध्ये झोपणे चांगले मानले जाते.

ही झोपण्याची स्थिती सांगते की संबंधित व्यक्ती सावध पण मोकळ्या स्वभावाची असते. ही पोझिशन पचनासाठी फायदेशीर असते, परंतु खांद्यांवर ताण येऊ शकतो.

सोल्जर पोजिशन ही झोपण्याची स्थिती सांगते की तुम्ही शांत व गंभीर स्वभावाचे आहात. या स्थितीत झोपल्यामुळे काही वेळा घोरण्याची समस्या अधिक त्रास देऊ शकते. तसेच स्लीप अ‍ॅपनियाचा त्रास असेल तर तो या स्थितीत अधिक वाढण्याचा धोका असतो. मात्र, मणक्याची योग्य रचना (बॅक अलाइनमेंट) राखण्यासाठी ही पोझिशन चांगली मानली जाते.

या स्थितीत झोपणाऱ्या व्यक्तीला इतरांचे ऐकून घेणे आवडते आणि तो एक निष्ठावान व्यक्ती म्हणून ओळखला जातो. मात्र, या पोझिशनमध्ये झोपल्याने घोरणे वाढू शकते आणि अ‍ॅसिडिटीचा त्रासही जास्त होऊ शकतो.

फ्रीफॉल पोझिशनमध्ये झोपणारे लोक धाडसी आणि थोडे उग्र स्वभावाचे असतात. परंतु, ही झोपेची पोझिशन मान आणि पाठीसाठी योग्य नाही. त्यामुळे मान व पाठीत दुखणं किंवा मुंग्या येण्याची शक्यता अधिक वाढते.

या फोटोमध्ये दाखवलेली झोपण्याची पोझिशन म्हणजे "स्पूनिंग पोझिशन" आहे. ही झोपण्याची पोझिशन एकमेकांमध्ये जवळीक निर्माण करते. या स्थितीत झोपल्याने ऑक्सिटोसिन नावाचा प्रेमाचा हार्मोन वाढतो, तणाव कमी होतो आणि नातं मजबूत होतं. पण सतत हलचाल झाल्यामुळे झोपेचा व्यत्यय येऊ शकतो.

या झोपेच्या स्थितीमध्ये सतत हालचाल केली जाते. सतत हालचाल करणे हे तणाव, चिंता किंवा चुकीच्या गादीमुळे होऊ शकते. यासाठी चांगली झोप मिळवण्यासाठी झोपण्यापूर्वी रिलॅक्सेशन तंत्रांचा वापर करणे फायदेशीर ठरते.