भाजी- वरणात जास्त पाणी पडून अगदीच फुळूक पातळ झालं? १ ट्रिक- ग्रेव्ही-वरण झटपट होईल दाटसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2025 14:01 IST2025-07-10T09:23:28+5:302025-07-10T14:01:34+5:30

प्रत्येक जण स्वयंपाक चांगलाच करण्याचा प्रयत्न करतो. पण तरीही कधीकधी स्वयंपाक करताना काही तरी चूक होते आणि भाजी किंवा आमटी अगदीच पातळ, पांचट होऊन जाते.
अशी पांचट आमटी, वरण किंवा भाजी कोणीही खात नाही. ती वाया जाते. म्हणूनच या काही टिप्स पाहून ठेवा. भाजी, आमटी जर गरजेपेक्षा जास्त पातळ झाली तर ती लगेचच दुरुस्त करायला या टिप्स खूप उपयोगी ठरतील.
जर तुम्ही पंजाबी स्टाईल भाजी करत असाल आणि तिची ग्रेव्ही जर खूप पातळ झाली तर कांदा आणि टोमॅटोची प्युरी करा आणि ती भाजीमध्ये घाला.
बेसनाचं पीठ पाण्यात कालवून भाजी किंवा आमटीमध्ये घातल्यानेही भाजी आळून यायला मदत होते.
शेंगदाणे आणि फुटाणे यांचा कूट पातळ झालेल्या भाजीमध्ये घाला आणि भाजी चांगली उकळून घ्या. ती छान आळून येईल.