लग्नसराईसाठी स्पेशल सिंगल मुनिया पैठणी; १० आकर्षक रंग-भरजरी पदरासह, पैठणीत उठून दिसाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 12:32 IST2025-11-21T12:20:53+5:302025-11-21T12:32:41+5:30
Special Single Muniya Paithani for wedding Season : कमी बजेटमध्ये उपलब्ध होणारी परंतू मुनिया नक्षी असलेली ही साडी आहे.

सिंगल मुनिया पैठणी (Single Muniya Paithani) ही महाराष्ट्राच्या समृद्ध वस्त्र परंपरेतील एक अतिशय खास आणि प्रतिष्ठीत प्रकार आहे. या पैठणीचे मुख्य वैशिष्ट्य तिच्या काठावर विणलेले मुनिया नक्षीकाम असते जे फक्त एका ओळीत असते. (10 Attractive colors Of Single Muniya Paithani)

मुनिया म्हणजे पोपट, जो या साडीला एक खास आणि पारंपारीक सौंदर्य देतो. म्हणूनच या साडीला मुनिया पैठणी म्हणतात. (Special Single Muniya Paithani for wedding Season)

काठावर पोपटाला हिरव्या रंगात विणले जाते, ज्यामुळे ते अधिक उठून दिसते. अनेकदा या डिझाईनला तोता-मैना असंही म्हणतात.

सिंगल मुनिया पैठणी तुम्हाला फक्त मोरपिशी रंगात नाही तर अनेक रंगांमध्ये उपलब्ध होईल.

लाल, पिवळा, निळा, हिरवा,जांभळा, गुलाबी या रंगात पैठणी उठून दिसेल.

या साड्यांमध्ये विशेषत:मँगो मस्टर्ड, मोरपंखी निळा, हिरवा, लाल-केशरी यांसारख्या तेजस्वी रंगांना जास्त मागणी असते.

कमी बजेटमध्ये उपलब्ध होणारी परंतू मुनिया नक्षी असलेली ही साडी आहे.

पदरावर आकर्षक मोराचे नक्षीकाम आणि अन्य पक्षीही असतात. आंब्याची बुट्टी, कमळाची बुट्टी विणलेली असते.

ही पैठणी विण्यासाठी कुशल कारागिरांना खूपच वेळ लागतो. ज्यामुळे ती एक किमती आणि टिकाऊ वारसा ठरते.

या साडीत तुम्हाला डार्क, लाईट दोन्ही शेड्सचे कलर कॉम्बिनेशन्स उपलब्ध होतील.

















