मलायका अरोरा सांगते फक्त २ मिनीटं ‘हा’ व्यायाम करा, वजन-पोट उतरेल भराभर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2025 15:16 IST2025-05-13T13:42:18+5:302025-05-13T15:16:13+5:30

वाढतं वजन कमी कसं करावं, असा प्रश्न अनेकांसमोर असतो. योग्य आहार आणि व्यायाम या दोन गोष्टींमुळे वजनावर नियंत्रण ठेवता येतं. पण काही जणांना व्यायाम करण्यासाठी खरोखरच वेळ नसताे तर काही जणांना व्यायामाचा खूप कंटाळा येतो.
अशा दोन्ही प्रकारच्या लोकांसाठी मलायका अरोराने एक खास सल्ला दिला आहे. तिने झटपट कोणता व्यायाम करता येईल जेणेकरून भराभर वेटलॉस होण्यासाठी मदत होऊ शकते, याविषयीची माहिती सांगणारा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
यामध्ये तिने एकूण चार व्यायाम सांगितले असून ते करण्यासाठी तुम्हाला फक्त २ मिनीटांचा वेळ काढायचा आहे. त्यापैकी पहिला व्यायाम आहे जंपिंग जॅक्स.. शक्य होईल तेवढ्या स्पीडमध्ये हा व्यायाम फक्त १ मिनिटासाठी करा. पोट, मांड्या, कंबर, दंड या भागावरची चरबी झटपट कमी करण्यासाठी हा व्यायाम उत्तम आहे.
यानंतरचा दुसरा व्यायाम आहे glute cicks. हा व्यायाम करण्यासाठी ताठ उभे राहा. यानंतर दोन्ही पाय एकानंतर एक गुडघ्यात वाकवून वर उचला आणि तळपाय मागच्या बाजूने हिप्सला लावा. हा व्यायाम ४० सेकंदासाठी करावा. सुरुवातीला हळूहळू करून नंतर स्पीड वाढवत न्यावी.
तिसरा व्यायाम आहे दोरीवरच्या उड्या. हा व्यायाम साधारणपणे ५० ते ६० सेकंद करावा. यामध्येही हळूहळू सरावाने स्पीड वाढवत न्यावी. यामुळे पाय, पोट, दंड याठिकाणची चरबी कमी होण्यास मदत होते.
चौथा व्यायाम आहे high knee tap. हा व्यायाम करण्यासाठी दोन्ही पाय एकानंतर एक यापद्धतीने गुडघ्यात वाकवून समोरच्या बाजुने वर उचला. हाताचे तळवे साधारणपणे तुमच्या कंबरेला समांतर ठेवा आणि गुडघे तळहातांना टेकविण्याचा प्रयत्न करा. हा व्यायामही शक्य होईल तेवढ्या स्पीडमध्ये ३० सेकंदासाठी करावा.
हे काही व्यायाम जर तुम्ही नियमितपणे केले तर वजनाच्या बाबतीत कमीतकमी दिवसांत तुम्हाला खूप चांगला परिणाम दिसून येईल.