Janmashtami 2025: पारंपरिक गोपाळकाला खाण्याचे ५ फायदे, भरपूर पोषण असलेला चविष्ट पदार्थ-आरोग्यवर्धक प्रसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2025 16:46 IST2025-08-14T09:11:55+5:302025-08-14T16:46:56+5:30

जन्माष्टमीच्या निमित्ताने घरोघरी गोपालकाला करून श्रीकृष्णाला त्याचा नैवेद्य दाखवला जातो (janmashtami special gopal kala). आपणही त्याच वेळी काला खातो. एरवी वर्षभर आवर्जून काला केला आणि तो खाल्ला असं होत नाही.

म्हणूनच आता गोपाल काला खाण्याचे हे काही फायदे वाचा. ते एकदा लक्षात घेतले तर इथून पुढे तुम्ही नेहमीच आवडीने गोपालकाला करून खाल..(benefits of eating gopal kala)

गोपाल काला करताना आपण त्यामध्ये पोहे, दही असे पदार्थ घालतो. पोहे पोटाला दमदार राहतात. पोहे खाल्ल्याने वारंवार भूक लागत नाही.

शिवास दही हे प्रोबायोटिक असतं. दह्यामधून प्रोटीन्स मिळतात. त्याशिवाय कॅल्शियम, व्हिटॅमिन बी १२ ही काही प्रमाणात मिळते.

दही आणि पोहे हे एक उत्तम फूड कॉम्बिनेशन मानलं जातं. त्यातून बऱ्याच प्रमाणात फायबर आणि मिनरल्स मिळतात.

याशिवाय गोपाल काला करताना त्यात आलं, कोथिंबीर, धने, जिरे असे पदार्थही घातले जातात. हे सगळेच पदार्थ पचनक्रिया अधिक चांगली करण्यासाठी मदत करतात.

गोपाल काल्यामध्ये डाळवंही असतं. त्यातून भरपूर प्रमाणात प्रोटीन्स मिळतात. त्यामुळेच एवढा बहुगुणी असणारा गोपाल काला नेहमीच सकाळी नाश्त्यासाठी अगदी उत्तम आहे.