सलाम! मंगळ आणि चंद्रावर जाण्याचं स्वप्न जगणाऱ्या इस्त्रोतल्या ७ महिला शास्त्रज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2023 01:15 PM2023-08-24T13:15:04+5:302023-08-24T13:41:27+5:30

Isro Women Scientist

या इस्त्रोमध्ये रॉकेट सायंटीस्ट आहेत, मंगळयान प्रकल्पावर त्या काम करत होत्या. मागील २० वर्षांपासून त्या इस्त्रोमध्ये काम करत असून त्यांनी आतापर्यंत १४ मिशनवर काम केले आहे.

मंगळयान प्रकल्पात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावलेल्या मौमिता दत्ता ऑप्टिकल आणि IR सेन्सर्स/इन्स्ट्रुमेंट्स/पेलोड्स (म्हणजे कॅमेरा आणि इमेजिंग स्पेक्ट्रोमीटर) चा विकास आणि चाचणीमध्ये पारंगत आहेत.

रितू करीधाल या चांद्रयान ३ मोहिमेच्या संचालक आहेत. २००७ मध्ये महान शास्त्रज्ञ आणि राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते यंग सायंटिस्ट पुरस्कारही मिळाला होता. चांद्रयान २ च्या मोहिमेतही त्यांनी संचालक पदाची धुरा सांभाळली होती.

या इस्त्रोतील निवृत्त शास्त्रज्ञ असून सॅटेलाईटसचे एकमेकांमध्ये कम्युनिकेशन करुन देण्यामध्ये त्यांचे स्पेशलायजेशन आहे. इस्त्रोमधील त्या सगळ्यात वरीष्ठ महिला शास्त्रज्ञ आहेत. सॅटेलाईट प्रोजेक्टच्या संचालक होणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत.

मंगळयानातील मेकॅनिकल इंजिनिअर्सच्या टिममध्ये काम करणाऱ्या महिला शास्त्रज्ञ म्हणून मिनल रोहीत यांची ओळख आहे. त्यांना लहानपणापासून डॉक्टर व्हायचे होते पण काही कारणाने त्या शास्त्रज्ञ झाल्या.

मुथया या चांद्रयान २ मोहिमेत प्रोजक्ट डीरेक्टर म्हणून काम करत होत्या. त्या इलेक्ट्रॉनिक सिस्टीम इंजिनिअर आहेत त्यामुळे त्यांनी इस्त्रोच्या सॅटेलाइट प्रोजेक्टसवर काम केले आहे. महिला सक्षमीकरणाचे त्या उत्तम उदाहरण आहेत.

अॅडव्हान्स लॉन्चर टेक्नॉलॉजिजवर काम करणाऱ्या डॉ. ललिथाम्बिका गंगायान मिशनमध्ये प्रमुख भूमिका बजावत होत्या. इस्त्रोमध्ये काम करत असताना त्यांनी आपला पीएचडीचा प्रबंध पूर्ण केला.