संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 19:01 IST2025-11-11T18:47:31+5:302025-11-11T19:01:04+5:30
संत्र्याच्या सालींचा कसा वापर करायचा जाणून घेऊया...

संत्री आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. संत्र्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, त्वचा निरोगी राहते आणि पचनास मदत होते. त्यात व्हिटॅमिन सी, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.

संत्र्यामध्ये असलेले पोषक घटक ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यास आणि स्ट्रोकचा धोका कमी करण्यास मदत करतात. त्यात फायबर असल्याने पोट भरल्यासारखं वाटतं आणि वजन कमी करण्यास मदत होते.

लोक अनेकदा संत्र्याच्या साली खाल्ल्यानंतर फेकून देतात. संत्र्याच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीइंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे तुमच्या आरोग्यासाठी, त्वचेसाठी फायदेशीर असतात. संत्र्याच्या सालींचा कसा वापर करायचा जाणून घेऊया...

फेस पॅक
संत्र्याच्या साली त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहेत. संत्र्याच्या साली वाळवा, त्याची पावडर बनवा आणि नंतर गुलाबपाण्यात मिसळून पेस्ट बनवा आणि तुमच्या चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्यावर ग्लो येईल.

घरातील किडे दूर करा
संत्र्याच्या सालीची पावडर बनवा, त्यात पाणी घाला आणि किडे किंवा इतर कीटकांना दूर ठेवण्यासाठी ते पाणी घरात शिंपडा.

घरातील दुर्गंधी दूर करा
तुम्ही तुमच्या घरातील कोणतीही दुर्गंधी दूर करण्यासाठी संत्र्याच्या सालीचा वापर करू शकता. साली वाळवा आणि तुमच्या खोलीत एका कपड्यात बांधून ठेवा. असं केल्याने त्याचा सुगंध घरभर पसरेल.

केसांची चमक
संत्र्याच्या साली केसांची चमक वाढवण्यास देखील मदत करतात. यामुळे कोंडा कमी होतो आणि तुमचे केस खूप मऊ होतात.

नॅचरल क्लिनर
तुम्ही संत्र्याच्या सालीचा वापर नॅचरल क्लिनर म्हणून देखील करू शकता. हे तुमचं घर स्वच्छ करण्यासाठी एक उत्तम नॅचरल क्लिनर आहेत. साली फेकून देण्याऐवजी तुम्ही त्यांचा अशा प्रकारे वापर करू शकता.

















