तेलाचा थेंबही न वापरता करा परफेक्ट कुरकुरीत डोसा ! उडप्याचे खास सिक्रेट - सुपर क्रिस्पी डोसा तयार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2025 17:50 IST2025-09-30T17:22:56+5:302025-09-30T17:50:21+5:30

How to Make Super Crispy Dosa Without Oil or Butter : how to make dosa without oil & butter : best tips for crispy dosa without oil & butter : how to make dosa crispy without oil & butter : घरच्याघरीच तेलाचा थेंबही न वापरता, रेस्टॉरंट स्टाइल किंवा उडप्याकडे विकत मिळतो तसा कुरकुरीत डोसा करण्याची ट्रिक...

आपल्यापैकी बऱ्याच घरांमध्ये नाश्त्याला इडली - डोसा असे पदार्थ हमखास केले जातात. डोसा म्हटलं की, तो खायला कुरकुरीत आणि क्रिस्पी (How to Make Super Crispy Dosa Without Oil or Butter) असेल तरच खाण्यात मजा आहे. शक्यतो, डोसा तयार करण्यासाठी आणि तो (best tips for crispy dosa without oil & butter) अधिक जास्त कुरकुरीत, क्रिस्पी होण्यासाठी आपण तेल, बटर किंवा लोणी वापरतो.

डोसा कुरकुरीत होण्यासाठी भरपूर तेल किंवा बटरचा वापर केला (how to make dosa without oil & butter) जातो, ज्यामुळे त्याचे हेल्दी गुणधर्म थोडे कमी होतात. इतकंच नाही तर, जर तुम्ही फिटनेस फ्रिक असाल किंवा कमी कॅलरीचा आणि तेलाशिवाय तयार केलेला डोसा खायचा असेल तर काही खास घरगुती टिप्स पाहूयात.

काही सोप्या वापरून आपण घरच्याघरीच तेलाचा थेंबही न वापरता, अगदी रेस्टॉरंट स्टाइल किंवा उडप्याकडे विकत मिळतो तासा कुरकुरीत डोसा तयार करू शकतो.

डोसा तयार करताना, बॅटरच्या कन्सिस्टन्सीकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. डोशाचे पीठ जास्त पातळ नसावे आणि खूप घट्टही नसावे. बॅटरची कन्सिस्टन्सी अशी असावी की ते तव्यावर सहजपणे पसरवता येईल. लक्षात ठेवा, जर पीठ घट्ट असेल, तर डोसा मऊमुलायम होईल आणि जर खूप पातळ असेल, तर तो तुटेल. यासाठी बॅटर मध्यम कन्सिस्टन्सीचे असावे जेणेकरून डोसा अधिक कुरकुरीत, क्रिस्पी होईल.

तेल, लोणी किंवा बटरचा वापर न करता डोसा कुरकुरीत, क्रिस्पी करण्यासाठी बॅटरमध्ये थोडा बारीक रवा घाला. यासाठी तुम्ही डोशाच्या बॅटरमध्ये एक ते दोन चमचे रवा घालू शकता. रव्यामध्ये स्टार्च आणि डोशाला ड्राय टेक्शचर देण्याचे खास गुणधर्म असतात. बॅटरमधील रव्यामुळे डोशाला कुरकुरीतपणा येतो.

डोसा तयार करताना तव्याची उष्णता खूप महत्त्वाची असते. डोशाचे बॅटर तव्यावर टाकण्यापूर्वी तवा चांगला गरम करा, त्यानंतर तो हलका थंड करून मध्यम आचेवर ठेवा. जास्त गरम तव्यावर पीठ चिकटायला लागते, तर थंड तव्यावर डोसा व्यवस्थित पसरत नाही. पण तवा जर योग्य तापमानावर गरम असेल तर डोसा समान प्रमाणात भाजला जातो आणि तेलाशिवायही तो सहजपणे कुरकुरीत होतो.

डोसा तयार करण्यासाठी एका मोठ्या चमच्याने डोसा बॅटर तव्याच्या मध्यभागी टाका आणि गोल-गोल फिरवत बाहेरच्या बाजूला पातळ पसरा. तुम्ही पीठ जितके पातळ पसराल, डोसा तितकाच कुरकुरीत होईल. जेव्हा डोसा पातळ असतो, तेव्हा त्याचा पातळ थर लवकर कोरडा होतो, ज्यामुळे डोसा तेलाशिवायही कुरकुरीत होतो.

डोसा तयार करण्यासाठी आपण तेलाचा वापर करत नसल्यामुळे, डोसा वाफेवर व्यवस्थित शिजवून घ्या. यासाठी, तव्यावर पीठ पसरवल्यानंतर, त्यावर झाकण ठेवून त्याला १ ते २ मिनिटे शिजवा. वाफेमुळे (Steam) डोसा वरच्या बाजूनेही शिजेल आणि खालच्या बाजूने कुरकुरीत होईल.

डोसा तव्याला चिकटत असेल, तर तेलाऐवजी लिंबाच्या रसाचे काही थेंब पाण्यात मिसळून त्याने तवा पुसून घ्या. लिंबातील आम्लीय गुणधर्म तव्याला डोसा तयार करण्यासाठी योग्य पद्धतीने तयार करते, आणि डोसा न चिकटता क्रिस्पी होण्यास मदत होते.

डोसा कुरकुरीत होण्यासाठी पीठ योग्यरित्या आंबलेले असणे सर्वात महत्त्वाचे आहे. पीठ मऊ आणि हलके झाल्यावर त्यात आपोआप जाळी पडते. पीठ किमान ८ ते १२ तास उबदार जागी ठेवा. थंडीच्या दिवसात पीठ लवकर आंबत नाही, तेव्हा ते ओव्हनमध्ये किंवा उष्ण ठिकाणी ठेवा.