चपाती-भाजी नकोय? १ वाटी बेसनाचा करा कुरकुरीत पोळा, ८ टिप्स, खमंग पोळा ५ मिनिटांत बनेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 12:31 IST2025-12-01T11:36:00+5:302025-12-01T12:31:50+5:30
Besan Chilla Recipe Chanyacha Pola : चण्याच्या पिठाच्या पोळ्याचे मिश्रण मध्यम जाड ठेवा. इडलीच्या पिठापेक्षा पातळ पण डोसा उत्तप्पाच्या पिठापेक्षा थोडं जाड असावे. खूप पातळ केल्यास पोळा फाटू शकतो.

सतत चपाती भाजी खाऊन कंटाळा आला की काहीतरी वेगळं खावंस वाटतं. अशावेळी तुम्ही झटपट तयार होणारा बेसनाच्या पिठाचा पोळा बनवू शकता. हा पोळा खायला चवदार, चविष्ट लागतो. काही टिप्स फॉलो केल्या तर चमचमीत, कुरकुरीत चण्याच्या डाळीचा पोळा घरीच बनेल. (Chanyacha Pola Kasa Kartat)

पीठ भिजवताना पाणी हळूहळू घाला आणि मिश्रण चांगलं फेटून घ्या. पिठात गुठळ्या अजिबात राहणार नाहीत याची काळजी घ्या. (Besan Chilla Recipe)

चण्याच्या पिठाच्या पोळ्याचे मिश्रण मध्यम जाड ठेवा. ते इडलीच्या पिठापेक्षा पातळ पण डोसा उत्तप्पाच्या पिठापेक्षा थोडं जाड असावे. खूप पातळ केल्यास पोळा फाटू शकतो. (How To Make Crispy Besan Chilla)

पोळा कुरकुरीत करण्यासाठी बेसनामध्ये बारीक रवा किंवा तांदळाचे पीठ एक ते दोन चमचे नक्की घाला.

मिश्रण तयार झाल्यानंतर किमान १५ मिनिटं झाकून बाजूला ठेवा. यामुळे रवा किंवा बेसन फुगून पोळा मऊ आणि जाळीदार होण्यास मदत होईल.

पोळा घालण्यापूर्वी तवा चांगला तापलेला असावा. जर तवा थंड असेल तर मिश्रण तव्याला चिकटते.

तव्यावर थोडं तेल किंवा तूप पसरवा आणि मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.

पोळा जास्त जाड ठेवू नका. तो मध्यम जाडीचा ठेवा. जाड पोळा आतून कच्चा राहू शकतो.

पोळा लवकर शिजण्यासाठी आणि मऊ राहण्यासाठी मिश्रण तव्यावर पसरवल्यावर १ मिनिटासाठी झाकण ठेवा.

जर पोळा खूप कडक होत असेल तर पिठात एक चिमूटभर बेकिंग सोडा किंवा इनो लगेच घाला.

















