थंडीत इडलीचं पीठ अजिबात फुगत नाही? ८ ट्रिक्स, पीठही फुगेल भरपूर आणि इडली होईल मऊ हलकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 17:44 IST2025-11-11T15:47:44+5:302025-11-11T17:44:30+5:30

Easy Tips To Ferment Idli Batter In Winter : पीठ वाटण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा. थंड पाण्याचा वापर केल्यास ही प्रक्रिया मंदावते.

थंडीच्या दिवसांत इडलीचं पीठ (Idli) फुगत नाही अशी तक्रार बऱ्याच जणांची असते. इडलीचे पीठ व्यवस्थित फुगावे आणि इडल्या सॉफ्ट व्हाव्यात यासाठी काही सोप्या टिप्स वापरूया. (Easy Tips To Ferment Idli Batter In Winter)

पीठ फुगवण्यासाठी उष्णता आवश्यक असते. त्यामुळे भांडे ओव्हनमध्ये बंद करून मायक्रोव्हेव्हमध्ये किंवा फ्रिजच्या वरच्या गरम भागाजवळ ठेवा. (How To Make Soft Idli)

डाळ-तांदूळ वाटताना मीठ घालू नका. मीठ घातल्यानं आंबवण्याची प्रक्रिया मंदावते. पीठ ८० टक्के फुगल्यानंतर किंवा इडली करण्यापूर्वी मीठ घाला. (Cooking Hacks)

पीठ वाटताना त्यात अर्धा चमचा साखर आणि १ चमचा भिजवलेले मेथी दाणे घाला.ज्यामुळे पीठ लवकर आंबते.

पीठ वाटण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा. थंड पाण्याचा वापर केल्यास ही प्रक्रिया मंदावते.

पीठ भांड्यात ठेवण्यापूर्वी २ ते ३ मिनिटं हातानं चांगलं मिसळून घ्या. हाताच्या त्वचेची नैसर्गिक उष्णता आणि सुक्ष्मजीव किण्वन सुरू करण्यास मदत करतात.

तांदूळ आणि डाळ मिक्सरमध्ये एकदम बारीक न करता थोडे जाडसर ठेवा. यामुळे इडली मऊ होते.

जर पीठ अजिबात फुगले नाही तर इडली करण्यापूर्वी त्यात १ चिमूटभर बेकिंग सोडा किंवा इनो घालून पटकन मिक्स करून इडल्या करा. यामुळे इडली सॉफ्ट होईल.

पीठ ठेवलेले भांडे एका मोठया भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात ठेवा. भांड्याला खालील बाजूनं उब मिळते.

पिठावर घट्ट झाकण न ठेवता थोडं हलकं किंवा अर्धवट झाकण ठेवा. जेणेकरून गॅस बाहेर पडेल.