एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 13:08 IST2025-08-06T12:58:24+5:302025-08-06T13:08:58+5:30

जर तुम्ही दररोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाल्ली तर तुम्हाला त्याचे अनेक फायदे पाहायला मिळतील.

भारतात अनेक प्रकारचे मसाले वापरले जातात आणि त्यापैकी एक म्हणजे वेलची. अनेकदा पदार्थात चव आणि सुगंध वाढवण्यासाठी वेलची हमखास वापरली जाते, पण तुम्हाला माहिती आहे का की त्याची चव जितकी भारी असते तितकेच ती खाण्याचे अनेक फायदे आहेत.

वेलचीमध्ये आयर्न आणि मँगनीज तसेच कॅल्शियम, पोटॅशियम आणि सल्फर असे अनेक फायदेशीर घटक असतात. जर तुम्ही दररोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाल्ली तर तुम्हाला त्याचे अनेक फायदे पाहायला मिळतील.

या धावपळीच्या जीवनात बहुतेक लोकांचं झोपेचं चक्र बरोबर नसतं. बऱ्याचदा लोकांना रात्री उशिरापर्यंत झोप येत नाही, ज्यामुळे ते दिवसभर थकलेले दिसतात. त्याचा परिणाम त्यांच्या आयुष्यावर तसेच दिवसभर त्यांच्या कामावर दिसून येतो.

वेलची खाल्ल्याने झोपेची समस्या दूर होते. त्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीरात मेलाटोनिन तयार करण्यास मदत करतात, ज्यामुळे चांगली झोप येण्यास मदत होते.

आजकाल बहुतेक लोक केस गळण्याच्या समस्येने त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत रात्री कोमट पाण्यासोबत वेलची घेतल्याने केस गळणं कमी होतं.

त्वचेवरील पिंपल्स दूर होऊन त्वचा सुंदर आणि चमकदार राहते.त्वचेसाठी देखील वेलची अत्यंत गुणकारी ठरते.

लोकांना पोटाशी संबंधित समस्यांचा त्रास असतो. जेवणानंतर त्यांना अ‍ॅसिडिटी होऊ लागते. बद्धकोष्ठता, जुलाब,अशा तक्रारी असतात, अशा लोकांनी वेलचीचे सेवन करावं. पचन सुधारतं आणि पोटाशी संबंधित समस्यांसाठी वेलची फायदेशीर आहे.

चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे आज प्रत्येक दोनपैकी एका व्यक्तीला लठ्ठपणाची समस्या आहे. हे सर्व चुकीच्या जीवनशैलीमुळे दिसून येतं. अनेकदा लोक लठ्ठपणा कमी करण्यासाठी खाणे-पिणे बंद करतात.

छोटीशी वेलची तुमचं वजन कमी करण्यात प्रभावी ठरेल. दररोज रात्री गरम पाण्यासोबत वेलची खाल्ल्याने फॅट्स कमी होण्यास मदत होते आणि वजन नियंत्रणात राहतं.