भात खाल्ल्यानं खरंच वजन वाढतं? भात 'या' पद्धतीनं खा-ना वजन वाढणार ना शुगर, फिट राहाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 20:36 IST2025-12-31T20:23:48+5:302025-12-31T20:36:59+5:30
Right Way To Consume Rice : भात पूर्णपणे आहारातून वगळण्यापेक्षा तुम्ही हेल्दी पद्धतीनं भाताचा आहारात समावेश करू शकता.

वजन वाढण्याच्या भितीनं आणि शुगर लेव्हल वाढण्याच्या भितीनं बरेचजण भात खात नाहीत. न्युट्रिशनिस्ट दीपाशिखा जैन यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. (Right Way To Consume Rice)

यात त्यांनी सांगितले आहे की भाताचे सेवन डायबिटीसचे रूग्णही करू शकतात. वेट लॉसच्या प्रक्रियेतही तुम्ही भरपूर भात खाऊ शकता. अन्न शिजवण्याची पद्धत ठरवते की अन्न कसे पचते आणि कसे प्रतिक्रिया देते.

एक प्लेट भात हा फायबर्सचा चांगला स्त्रोत असू शकतो. फक्त यावर अवलंबून असते की तुम्ही भात कसा बनवत आहात.

भात पूर्णपणे आहारातून वगळण्यापेक्षा तुम्ही हेल्दी पद्धतीनं भाताचा आहारात समावेश करू शकता.

दीपाशिखा सांगतात की तुम्ही भात शिजवून लगेच खात असाल तर तुमच्यासाठी हे नुकसानकारक ठरू शकते. ताज्या भातात जास्त स्टार्च असते जे शुगर वाढवते या भातात कॅलरीजही जास्त असतात ज्या वेगानं वजन वाढवतात.

डायबिटीक, प्री डायबिटीस आणि वजनाच्या समस्या असलेल्या लोकांसाठी भात खाणं जोखिमीचं ठरू शकतं. ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते.

ताजा गरम भात खाण्याऐवजी थंड करून भात खाल्ल्यास त्यात फायबर्स जास्त असतात. फायबर्स पचनक्रिया मंद गतीनं करतात. ज्यामुळे ब्लड शुगर लवकर वाढत किंवा कमी होत नाही.

जे एक प्रकारचे फायबर्स असतात जे तब्येतीसाठी चांगले ठरतात. ज्यामुळे शुगर वाढत नाही. यात कॅलरीजसुद्धा कमी असतात.
















