झटपट करता येणारे कचोरीचे ५ प्रकार, थंडीसाठी कुरकुरीत मेजवानी - नाश्त्यासाठी खास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2025 15:28 IST2025-11-21T15:14:08+5:302025-11-21T15:28:55+5:30

5 types of quick-to-make kachori, a crunchy treat for winter - perfect for breakfast : मसालेदार कचोरी करायच्या ५ रेसिपी. नक्की करा.

कितीही पिझ्झा बर्गर खाल्ले तरी समोसा, वडापाव, भजी, कचोरी या पदार्थांसाठीचे प्रेम काही कमी होत नाही. चहासोबत यातील कोणताही पदार्थ खायला मिळाला की मूड कसा एकदम मस्त होतो.

थंडीच्या दिवसांत गरमागरम काही खायची इच्छा होत असेल तर कचोरी नक्की खा. ५ प्रकारच्या कचोरी घरी करता येतात. सोप्याही असतात आणि चवीला एकापेक्षा एक भारी असतात.

मूगडाळ घालून केलेली डालकचोरी खमंग, कुरकुरीत आणि चविष्ट असते. संध्याकळाच्या नाश्त्यासाठी हा पदार्थ एकदम मस्त आहे. मूगडाळ, कांदा, मसाले, लसूण, हिरवी मिरची असे बेसिक पदार्थ घालून ही कचोरी करता येते.

थंडीच्या दिवसांत छान ताजे मटार मिळतात. त्यामुळे मटार कचोरी तो बनती है!! भरपूर आलं घालून केली जाणारी ही कचोरी गरमागरम चहासोबत किंवा हिरव्या चटणीसोबत एकदम मस्त लागते.

उडदाची डाळ, आमचूर पूड, जिरे, हिंग, असे सगळे पदार्थ एकत्र परतून त्याचे सारण करायचे. कचोरी तयार करुन तळायची. अशी खास्ता कचोरी फार लोकप्रिय पदार्थ आहे.

आलू कचोरी म्हणजेच बटाटा कचोरी सगळीकडेच उपलब्ध असते. ही कचोरी मोठी नसून लहान असते. तसेच ती घरीही करता येते. साधे बटाट्याचे सारण भरुन केली जाते.

थंडीच्या दिवसात भरपूर मागणी असते ती या प्याज कचोरीला. भरपूर कांदा आणि मसाले घालून केला जाणारा हा पदार्थ एकदम मस्त असतो. चमचमीत आणि झणझणीत असतो. तसेच कुरकुरीतही असतोच.