'या' गोष्टी सांभाळा आणि मनात कोणताही गिल्ट न ठेवता मनापासून दिवाळी फराळाचा आस्वाद घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2025 11:10 IST2025-10-20T11:09:09+5:302025-10-20T11:10:01+5:30

दिवाळीच्या फराळाचा आनंद उपभोगायचा असेल तर फक्त काही गोष्टी सांभाळा. यामुळे एकतर तुमच्या मनात कोणताही गिल्ट राहणार नाही, तुम्हाला वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेता येईल आणि दुसरं म्हणजे वजन आणि शुगर वाढण्याची भीतीही नाही..

त्या गोष्टी नेमक्या कोणत्या याविषयीची आहारतज्ज्ञ मंजिरी कुलकर्णी यांनी दिलेली खास माहिती.. त्या म्हणतात की दिवाळी हा आनंदाचा क्षण आहे.. त्यामुळे फराळ न करून स्वत:च्या आणि घरच्यांच्या आनंदावर विरझण घालू नका. त्याऐवजी फक्त काही साध्या सोप्या गोष्टी करा...

काहीही झाले तरी व्यायाम टाळू नका. रोज जेवढा व्यायाम करता तेवढाच दिवाळीच्या दिवसांतही कराच..

portion control खूप गरजेचं आहे. खूप जण फराळावर बकबका ताव मारतात. असं करू नका. पदार्थांचा एकेक घास घ्या आणि तुमची सगळी इंद्रिये वापरून त्याचा पुरेपूर आस्वाद घ्या म्हणजे तुमचे मन लवकर आणि कमी पोर्शन मध्ये भरेल.

फराळ पण पोटभर करणार, जेवणावर पण यथेच्छ ताव मारणार... असं करू नका. जेवणामध्ये सलाड, प्रोटीनयुक्त पदार्थ अधिक घ्या. तेलकट, तुपकट, तिखट कमी खा.

रोज १०००० पावले रोज पूर्ण करा. वाॅकिंग करत राहा. शरीराची हालचाल करत राहा. आणि फराळाचाही आनंद घ्या.