काकडीचे ५ पदार्थ म्हणजे चव चमचमीत आणि पचायला हलके- पौष्टिक, पारंपरिक चवीचा खजिना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2025 12:29 IST2025-11-17T12:23:56+5:302025-11-17T12:29:43+5:30

5 cucumber dishes that are delicious and easy to digest - a treasure trove of nutritious, traditional flavors, must try recipes : चवीला एकदम मस्त असणाऱ्या या रेसिपी नक्की करा. काकडीचे असेही पदार्थ असतात.

काकडी हा पदार्थ शरीरासाठी फार पोषक ठरतो. काकडीमध्ये कॅलेरिज, फॅट्स एकदम कमी असतात. त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पचनासाठी मदत होते आणि वजनही नियंत्रित राहते.

काकडी जरी नुसती खाल्ली जात असली तरी काकडीचे काही पदार्थ करता येतात. हे पदार्थ करायला अगदी सोपे असतात तसेच चवीला मस्त असतात. काकडीचे पदार्थ फारच खमंग लागतात. त्यामुळे नक्की करुन पाहा.

काकडीचे धोंडस हा पदार्थ तसा आजकाल फार केला जात नाही. मात्र केकची क्रेझ भारतात नव्हती तेव्हापासून हा गोडाचा पदार्थ केला जात आहे. फार मस्त लागतो तसेच करायला सोपा आहे.

काकडीचे थालीपीठ करतात. थालीपीठ हा एक अत्यंत लोकप्रिय महाराष्ट्रातील पदार्थ आहे. नाश्त्यासाठी खास केला जातो. काकडीचे थालीपीठ करायला अगदी सोपे असते. तसेच चवीला मस्त लागते.

काकडीने घावन कधी खाल्ले का ? जसे साधे घावन करता तसेच करायचे फक्त त्यात किसलेली काकडी घालायची. मसाले घालायचे आणि छान खमंग परतायचे.

काकडीची कोशिंबीर तर घरोघरी केली जातेच. पोटाला आरामदायी ठरते. पौष्टिक तर असतेच, शिवाय त्याला फोडणी देऊन किंवा इतरही काही पदार्थ घालून विविध प्रकारची कोशिंबीर करता येते. चवीत पर्याय असतात.

काकडीची भाजीही केली जाते. इतर भाज्यांसाठी जशी फोडणी करता तशीच फोडणी करायची. त्यात काकडी परतायची. दाण्याचे कुट नारळ असे पदार्थ घालून छान चविष्ट करता येते.