कलशातून पडले अमृताचे थेंब, भाविकांनी आकाशात बघितलं समुद्र मंथन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 19:14 IST2025-01-26T19:05:09+5:302025-01-26T19:14:40+5:30

Mahakumbh 2025 drone show samudra manthan: प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात भाविकांना अविस्मरणीय असा ड्रोन शो बघायला मिळाला. तब्बल २५०० ड्रोनच्या सहाय्याने आकाशात शंखनाद, समुद्र मंथनाची दृश्ये साकारण्यात आली.

अवर्णनीय आणि अविश्वसनीय, असं वाटेल असाच शो महाकुंभमेळ्याला आलेल्या भाविकांना बघायला मिळाला.

२५०० ड्रोनच्या सहाय्याने प्रयागराजच्या आकाशात शंखनाद, समुद्र मंथन आणि कलशातून पडलेलं अमृत आदी साकारण्यात आले.

संस्कृती, अध्यात्म आणि तंत्रज्ञानाचा सुरेख मिलाफ यानिमित्ताने कोट्यवधि भाविकांना बघायला मिळाला.

शुक्रवारी (२३ जानेवारी) झालेल्या ड्रोन शोची सुरूवात शंखनाद करून झाली. त्यानंतर समुद्र मंथन काव्य आकाशात जिवंत होताना भाविकांनी बघितले.

कुंभ कलशातून अमृताची थेंब पडले आणि भाविकांनी हात जोडले. या ड्रोन शो साठी वेगवेगळ्या संकल्पनांची निवड करण्यात आली होती.

समुद्र मंथनानंतर महादेव विष प्राशन करताना दाखवण्यात आले. त्याचबरोबर इतरही प्रसंग ड्रोनच्या सहाय्याने साकारण्यात आले.

शो सुरू झाल्यानंतर प्रयागराजचे आकाश रंगीबेरंगी प्रकाशाने उजळून निघाले. शो सुरू झाल्यानंतर देशाच्या वेगवेगळ्या भागातून आलेले भाविक थक्क होऊ बघत राहिले.