ब्रेकअपचं मोठं कारण आहेत मुलांच्या 'या' सवयी, ज्या मुली अजिबात खपवून घेत नाहीत....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 11:28 AM2020-03-11T11:28:36+5:302020-03-11T11:50:06+5:30

रिलेशनशिपमध्ये असताना तुमच्या अशा अनेक सवयी असतात. ज्या पार्टनरला आवडत नाहीत. मुलांबद्दल बोलत असाल तर मुलांच्या अनेक सवयी अशा आहेत ज्या मुलींना खटकतात. म्हणजेच मुली सगळ्या बाबतीत परिपूर्ण असतात. असं नाही तरी सुद्धा त्यांना मुलांच्या वागण्यातील काही गोष्टींचा त्रास होत असतो.

अनेकदा हे कारण मुलांना सोडून जाण्यामागचं सुद्धा असू शकतं आज आम्ही तुम्हाला मुली मुलांना का डिट्च करतात. कोणत्या सवयींमुळे निहेटिव्ह होतात मग ब्रेकअप होतं हे सांगणार आहोत.

मुलींना खूप इरिटेट होतं.जेव्हा मुलं इतरांची जास्त मस्करी करतात. किंवा स्वतःला शहाणं समजण्याचा प्रयत्न करतात. कारण तुम्ही स्वतः कसे बरोबर आहात आणि लोक कसे चुकीचे असं सांगण्याचा प्रयत्न करत असाल तर नक्कीच मुलींची चिडचिड होऊ शकते.

तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत डेटवर जात असता. त्यावेळी सतत फोनवर बोलत असाल किंवा फ्रेंन्डसचे मॅसेज आणि ऑफिसच्या कामाला महत्व देत असाल तर मुलींना तुमचा राग येण्याची शक्यता असते. अनेकदा यात कारणामुळे ब्रेकअप होतं.

मुली अनेकदा सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग करत असतात.अशात जर मुलांनी अचानक काही प्लॅन बनवला तर मुलींना त्याचा खूप राग येतो. अशावेळी होणारं भांडण टाळण्यासाठी मुलींनी केलेला प्लॅन कॅन्सल करण्याचा प्रयत्न करू नका.

वस्तुंचा वापर केल्यानंतर कचरा तिथेच टाकणं हे अनेकदा दिसून येतं. मुली याच गोष्टीमुळे मुलांचा राग करतात. कारण अनेकांना स्वच्छता आणि टापटीप राहणीमान प्रिय असतं. अशात पार्टनर जर स्वच्छचा ठेवत नसेल तर मुलींना खटकतं.

फिजिकल टचचा अभाव असेल तर मुलींना राग येत असतो. गप्पा मारणे, मिठी मारून प्रेम व्यक्त करणे अशा भावना फिजीकल टच करून व्यक्त केल्या जातात पण जर तुमच्या रिलेशनशीपमध्ये स्पर्शाचा अभाव असेल तर तुम एकटेपणा वाटून मुलींची चिडचिड होते. त्यामुळे मुली मुलांपासून लांब जातात.

तुम्ही जेव्हा इतर मुलींशी बोलत असता तेव्हा पार्टनरला जराही आवडत नसतं. त्या खूप जळत असतात. पण ही गोष्ट ते आपल्या पार्टनरला कधीही सांगत नाहीत. जर तुम्ही पार्टनरला जळवण्यासाठी सतत इतरांशी बोलत असला तर पार्टनरची चिडचिड होण्याची शक्यता असते. त्यामुळे वादाला तोंड फुटतं आणि मुली ब्रेकअप करण्याचा विचार करतात.