एक्सला खबरही लागू न देता ब्रेकअपनंतर ही ६ कामे करतात मुली!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 12:46 PM2018-10-23T12:46:45+5:302018-10-23T13:05:52+5:30

प्रेमाच्या नात्यात कुणासाठीही सर्वात अवघड काळ असतो तो ब्रेकअपचा. काही लोक यातून सहजपणे बाहेर येतात तर काही लोकांना यातून बाहेर येणं फार कठीण असतं. मुलगा असो वा मुलगी दोघांनाही ब्रेकअफ हादरवून सोडतं. अनेकजण तर यातून आलेल्या डिप्रेशनमुळे आत्महत्येसारखं पाऊलही उचलतात. अशावेळी खासकरुन मुलींचं वागणं जरा वेगळं असल्याचं मानलं जातं.

रिसर्चनुसार, काही मुली ब्रेकअप झाल्यावर आयुष्याकडे वेगळ्या दृष्टीकोनातून बघायला लागतात. त्यामुळे त्या नव्याने विचार करायला लागतात. ब्रेकअप झाल्यानंतर मुली काय करतात याची काही निरीक्षणे काही रिसर्चमधून समोर आली आहेत. चला जाणून घेऊ काय आहेत ही निरीक्षणे....(Image Credit : Reader's Digest)

१) ब्रेकअपनंतर मुली सर्वातआधी बॉयफ्रेन्डचा नंबर आपल्या फोनमधून डिलीट करतात. जेणेकरुन कितीही आठवण आली तरी त्या त्याला कॉल करु नये. पण त्यांच्या बॉयफ्रेन्डचा नंबर त्यांच्या नेहमीसाठी लक्षात असतो. (Image Credit : Love Dignity)

२) ब्रेकअपनंतर मुली आपलं मन हलकं करण्यासाठी आपल्या खास दोस्तांकडे जातात. अशावेळी त्या अशा मैत्रिणींची निवड करतात ज्यांच्याकडे त्या आपल्या मनातील गोष्टी सांगू शकतील आणि ज्या त्यांना समजून घेऊ शकतील. (Image Credit : www.beautyandtips.com)

३) ब्रेकअपनंतर खासकरुन मुली पूर्णपणे रिलेशनशिप एक्सपर्ट होतात. म्हणजे कुणाच्याही रिलेशनशिपमध्ये काहीही झालं तरी या सल्ला द्यायला तयार असतात. आपल्या ग्रुपमधील इतर मुलींना त्या रिलेशनशिपवर लेक्चर देऊ लागतात. आणि इतरांची प्रत्येक गोष्ट त्यांना आलेल्या अनुभवाशी जोडत असतात. (Image Credit : The Independent)

४) फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर आपल्या एक्सला ब्लॉक करुन पुन्हा अनब्लॉक करणे हेा सिलसिला सतत सुरु असतो. त्या हे यासाठी करतात, कारण त्यांना जाणून घ्यायचं असतं की, वेगळं होऊन त्यांचा बॉयफ्रेन्ड काय करत आहे. ही बाब मुलांनाही लागू पडते. (Image Credit : The Independent)

५) ब्रेकअपनंतर मुली जेव्हा दुसऱ्या कपल्सना बघतात तेव्हा त्यांना त्यांच्या बॉयफ्रेन्डसोबत घालवलेले क्षण आठवतात. आणि मग त्या जुन्या गोष्टी आठवून उदास होतात. त्यामुळेच त्या ब्रेकअपनंतर इतर कपल्सपासून दूर पळण्याच्या प्रयत्नात असतात. (Image Credit : ursula.cafeblog.hu)

६) ब्रेकअपनंतरही मुली आपल्या बॉयफ्रेन्डच्या प्रोफाईलवर सतत नजर ठेवून असतात. आपल्या एक्सबाबत जाणून घेण्यासाठी त्या सोशल साईट्सचा वापर करतात. (Image Credit : The Independent)