आठवड्याचे राशीभविष्य : 7 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर 2021; 'या' राशीला मिळणार सुखद धक्का; आर्थिक स्थिती होईल मजबूत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 10:05 AM2021-11-08T10:05:15+5:302021-11-08T10:10:02+5:30

Weekly Horoscope 7 November to 13 November 2021 : कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

हा आठवडा आपल्यासाठी समृद्धिदायक असला तरी आठवड्याची सुरवात काहीशी नाजूकच होईल. आपण एखाद्या गोष्टीने चिंतीत व्हाल. आपली प्रकृती सुद्धा थोडी बिघडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आपणास योग्य वैद्यकीय उपचार घ्यावे लागतील. आपण आपल्या कामांना प्राधान्य दिल्यामुळे आपली प्रतिमा सुद्धा उजळेल. आपण आपल्या कामात सर्वात आघाडीवर व वेगळे असे दिसून याल. आपल्या व्यापाराची वृद्धी होईल. आपल्या प्राप्तीत चांगली वाढ होईल. आपण एखाद्या ज्ञानी महिलेच्या संपर्कात याल, जी आपल्या जीवनात बदल घडवून आणणारा एखादा सल्ला आपणास देईल. आपणास कितीही चांगली प्राप्ती झाली तरी विनाकारण आपण चिंतीत होण्याची शक्यता आहे.

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आपण आपल्या वैवाहिक जीवनातील व वैवाहिक जोडीदाराप्रती असलेल्या जवाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडू शकाल. आपल्या वैवाहिक जोडीदाराची प्रकृती बिघडल्याने आपण त्रस्त व्हाल व त्यामुळे आपल्यात कमीपणाची भावना निर्माण होण्याची शक्यता आहे. परंतु घाबरू नका. धीर धरा. आठवड्याच्या मध्यास खर्च व चिंता वाढण्याची शक्यता असल्याने आपणास आर्थिक नियोजन करण्यावर सुद्धा लक्ष द्यावे लागेल. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा आठवडा चांगला आहे. त्यांना त्यांच्या कष्टांचे यथोचित फल मिळेल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी आव्हानात्मक आहे. त्यांच्या खर्चात वाढ होईल. आपली प्रकृती नाजूक होण्याच्या शक्यतेमुळे जास्त ताण घेऊ नये. ह्या आठवड्यात कोणाशीही शत्रुत्व झाल्यास आपला बराचसा पैसा खर्च होण्याची संभावना आहे. प्रेमीजनांसाठी हा आठवडा चांगला आहे. विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळतील. एखाद्या सरकारी नोकरीसाठी आपली निवड संभवते. आठवड्याचा उत्तरार्ध प्रवासासाठी अनुकूल आहे.

हा आठवडा आपल्यासाठी उत्तम आहे. आपण आपल्या कामावर पूर्णतः लक्ष दिल्याने आपणास चांगले परिणाम सुद्धा मिळतील. आपल्या कामगिरीची प्रशंसा होईल. आपल्या अनुभवास किंमत येईल. व्यापाऱ्यांसाठी सुद्धा हा आठवडा अनुकूलतेचा आहे. आपला एखादा जुना मित्र कि जो उच्च पदस्थ असेल त्याची भेट होऊन आपणास एखादा मोठा सौदा करण्याची संधी मिळू शकते. प्रणयी जीवनात स्थिती पूर्ववतच राहील. हा आठवडा प्रेमीजनांसाठी विशेष अनुकूल नसल्याने त्यांना थोडे संयमात राहावे लागेल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात रोमांस वाढेल. वैवाहिक जोडीदाराची वागणूक सासुरवाडी कडील लोकांशी चांगली असल्याने आपण आनंदित व्हाल. आपल्या कुटुंबातील वातावरण उत्तम राहील. कौटुंबिक गरजांवर लक्ष देऊन एखादा मोठा निर्णय आपले कुटुंबीय घेतील, ज्यात आपले सुद्धा थोडे योगदान असेल. आपल्या खर्चात कपात होईल, तर प्राप्ती चांगली होईल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

ह्या आठवड्याच्या सुरवातीस काही लोकांसाठी आपण खास असावे अशी आपली इच्छा असेल. ह्या दरम्यान आपणास असंतोषातून पळ काढण्या ऐवजी एखादे चांगले समाधान शोधण्याची गरज भासेल. आपल्यावर भावनात्मक स्नेह व प्रेम करणाऱ्या व्यक्ती सोबत आपले जीवन व्यतीत करण्यास आपण तयार व्हाल. शरीरातील विषारी पदार्थ संपूर्णतः बाहेर पडावीत म्हणून आठवड्याच्या मध्यास जास्तीत जास्त पाणी प्यावे. ऋतू बदलाचा आपल्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची संभावना आहे. पूर्वार्धा नंतर आपण एखाद्या नवीन उर्जेसह वाटचाल कराल. ह्या दरम्यान आपल्यावर जर अतिरिक्त जवाबदारी सोपविण्यात आली तर तिचा आनंदाने स्वीकार करण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे. आठवड्याच्या उत्तरार्धात आर्थिक चिंता कमी होण्याची शक्यता आहे. ह्या दरम्यान प्राप्तीत वाढ करण्यासाठी आपण एखादी नवीन योजना तयार करू शकाल. आठवड्याचे सुरवातीचे व अखेरचे दिवस विद्यार्थ्यांसाठी चांगले असले तरी मधल्या दिवसात त्यांना काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपण आपल्या कुटुंबाकडे लक्ष देऊ शकाल. कुटुंबियांच्या गरजा समजून घेऊन त्यांच्यासह वेळ घालवाल. नोकरीकडे सुद्धा आपण लक्ष द्याल. असे केल्याने समतोल साधला जाऊन आपणास त्याचा यथोचित लाभ होईल. व्यापाऱ्यांना विदेशी स्रोतातून काही लाभ संभवतो, जो आपल्या अत्यंत कामी येईल. प्रेमीजनांना ह्या आठवड्यात सुद्धा आपले जीवन आनंदित करण्याची भरपूर संधी मिळेल. आपण आपल्या प्रिय व्यक्तीचे म्हणणे ऐकून आपल्यात काही बदल घडवून आणण्याचा प्रयत्न सुद्धा कराल. आपल्यात एका नवीन प्रेमाची भावना निर्माण होऊन आपणास आनंदित करेल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्यपणेच वाटचाल करणारे असेल. वैवाहिक जोडीदाराच्या माध्यमातून आपणास एखादा चांगला लाभ होण्याची शक्यता आहे. आपली प्रकृती चांगली राहणार असल्याने आरोग्य विषयक काहीच काळजी करावी लागणार नाही.

हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण चिंताग्रस्त असाल. त्याचा आपल्या शरीरावर प्रतिकूल परिणाम होताना दिसून येईल. आपल्या शरीरावर फोड किंवा चेहेऱ्यावर मुरूम होण्याची शक्यता आहे. ह्या व्यतिरिक्त एखाद्या एलर्जीचा त्रास होण्याची सुद्धा संभावना आहे. हा आठवडा विवाहितांसाठी चांगला आहे. प्रेमीजनांना आपल्या प्रणयी जीवनासाठी वेळ काढून कशा प्रकारे जीवनात वाटचाल करावी हे समजून घ्यावे लागेल. नोकरी करणाऱ्या जातकांची कामगिरी चांगली झाल्याने त्यांची प्रशंसा सुद्धा होईल. व्यापाऱ्यांना कामात यश मिळून प्राप्तीत वाढ होण्याची व बँकेतील शिल्लक वाढण्याची शक्यता वाढेल. हा आठवडा प्रवासासाठी प्रतिकूल आहे.

हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपल्याकडे पैसा कोठूनही येऊ शकतो, जो आपण बँकेत जमा करून आपल्या स्थितीस मजबूती देऊ शकाल. आपणास शासनाकडून सुद्धा चांगला लाभ होईल. आपल्यापैकी जे जातक सरकारी नोकरीत आहेत त्यांची पदोन्नती सुद्धा संभवते. आपणास आपल्या वागणुकीवर लक्ष द्यावे लागेल. कोणालाही कमी लेखण्याची चूक करू नका. कौटुंबिक जीवन समाधानी राहील. प्रणयी जीवनात काही समस्या न आल्याने आपण आपल्या प्रणयी जीवनाचा आनंद सहजपणे घेऊ शकाल. विवाहितांना आपल्या वैवाहिक जीवनात थोडी नीरसता जाणवेल. मात्र, आपण प्रयत्न केल्यास हि नीरसता प्रेमात परिवर्तित होऊ शकते. नोकरी करणाऱ्या जातकांना चांगले परिणाम मिळतील. आपली मेहनत यशस्वी होईल. व्यापारात चांगला लाभ होईल. आपली प्रकृती नाजूक होण्याच्या शक्यतेमुळे आपणास आपल्या आहारावर लक्ष ठेवावे लागेल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आपला स्वतःवर खूप विश्वास असल्याने प्रत्येक काम आपण स्वतःच कराल व त्यामुळे आपल्या आत्मविश्वासात सुद्धा वाढ होईल. त्यामुळे आपली सर्व कामे होतील. नोकरी करणाऱ्या जातकांना चांगले परिणाम मिळतील. आपले कष्ट आपल्या कामी येतील. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा स्वतःला स्थापित करण्याचा आहे. आपणास बाजारात थोडी जोखीम घ्यावी लागेल. गुंतवणूक करणे आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. आपल्या प्राप्तीत वाढ होईल. प्रवासामुळे आपला फायदा होईल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी खूपच चांगला आहे. आपण प्रेम विवाहाच्या दिशेने वाटचाल करू शकाल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्यच राहील. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपल्या खर्चात वाढ होताना दिसून येईल, व त्यामुळे आपण त्रस्त होण्याची सुद्धा शक्यता आहे. आठवड्याच्या मध्यास त्यात कपात होईल. आपण स्वतःकडे लक्ष द्याल. आपण नवीन कपडे किंवा मोबाईल किंवा तत्सम उपकरण खरेदी करू शकाल. केश कर्तनालयात वेळ घालविण्यास आपण प्राधान्य द्याल. आठवड्याच्या अखेरच्या दिवसात आपण कुटुंबियांना वेळ द्याल. त्यांच्या गरजा समजून घेऊन आपल्या प्राप्तीत वाढ कशी करावी ह्यावर आपण लक्ष द्याल. हा आठवडा नोकरी करणाऱ्या जातकांसाठी खूपच आशा निर्माण करणारा आहे. आपणास एखादी बक्षिसी मिळू शकते. व्यापाऱ्यांना नवीन प्रयोग करण्यात यश प्राप्त होईल. आपणास लहान - सहान बारकावे अभ्यासून वाटचाल करावी लागेल. प्रणयी जीवनात तणाव वाढण्याची शक्यता आहे. संवाद साधावा, मात्र भांडणे टाळण्यासाठी जास्त वेळ एकमेकांशी बोलू नये. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. हा आठवडा प्रवासासाठी अनुकूल नसला तरी आवश्यकता भासल्यास आठवड्याच्या मधल्या दिवसांची निवड करू शकता.

हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपण स्वतः नवीन काही शिकून इतरांना ते शिकविण्याचा प्रयत्न कराल. खर्चात वाढ होईल, त्यावर लक्ष ठेवावे लागेल. नोकरी करणाऱ्या जातकांना कामात चांगले परिणाम मिळतील. आपली बुद्धिमत्ता व कौशल्य ह्यामुळे आपण आघाडीवर राहाल. वरिष्ठ सुद्धा आपल्या कामगिरीने प्रभावित होतील. व्यापाऱ्यांना आपल्या व्यापारात उत्तम यश प्राप्तीचे प्रशस्त मार्ग सापडतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन शांतिमय असेल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा सर्जनशीलतेचा आहे. आपण आपले मित्र व आपली प्रिय व्यक्ती ह्यांच्यासह एखाद्या प्रवासाचे आयोजन करू शकाल. कौटुंबिक जीवन समाधानकारक राहील. आपले आरोग्य उत्तम राहील. आपल्या प्रयत्नाने आपली आर्थिक स्थिती मजबूत करण्याची आपणास संधी मिळेल.

हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवाती पासूनच आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित करून आपले लक्ष्यांक पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. आपण जे काम हाती घ्याल ते वेळेवर पूर्ण कराल व त्यामुळे आपली प्रतिमा उजळेल. वरिष्ठ आपल्यावर खुश होतील. व्यापाऱ्यांना आपल्या व्यापारास गती देण्यासाठी नवीन लोकांना समाविष्ट करून घ्यावे लागेल. आपणास प्रवासातून चांगले परिणाम प्राप्त होऊन व्यापारास गती येईल व नफ्यात सुद्धा वाढ होईल. खर्चात कपात झाल्याने आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. प्रकृतीत सुधारणा झाली तरी समतोल आहार घेणे हितावह ठरेल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्यच राहील, परंतु वैवाहिक जोडीदाराशी एखाद्या गोष्टीमुळे कटुता निर्माण होऊ शकते. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. नात्यातील प्रेम वाढेल. रोमांस वाढून एकमेकांशी जवळीक सुद्धा वाढेल. विद्यार्थ्यांची अध्ययनातील कामगिरी उत्तम होईल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपणास काही नवीन गोष्टी समजून घेण्याची संधी मिळेल. आपल्या कामांसाठी ह्या गोष्टी समजून घेणे आपल्यासाठी महत्वाच्या असतील. त्यामुळे आपण आपल्या कामात आणखी सुधारणा करू शकाल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी थोडे लक्ष देण्याचा आहे. आपली आर्थिक गुंतवणूक चुकीच्या जागी होऊन आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. घाईघाईत कामे करून आपले नुकसानच होईल. आपले आरोग्य उत्तम राहील. ह्या आठवड्यात विवाहितांना आपल्या जीवनात सामंजस्य राखताना काही समस्यांना सामोरे जावे लागेल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. विद्यार्थ्यांना आपल्या कष्टांचे यथोचित फल मिळेल. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.