आठवड्याचे राशीभविष्य : 4 जुलै ते 10 जुलै 2021, 'या' राशीच्या व्यक्तींना व्यवसायात अपेक्षित यश मिळेल, उत्पन्न वाढेल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 09:48 AM2021-07-05T09:48:00+5:302021-07-05T10:03:08+5:30

Weekly Horoscope 4 July to 10 July 2021 : कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

हा आठवडा आपल्यासाठी खूप चांगला आहे. आपले आत्मबल वाढेल. आजवर आपण इतरांना महत्व देत होता, मात्र आता आपण स्वतःला महत्व देण्यास सुद्धा प्राधान्य द्याल. आपल्या वाणीत एक प्रकारचे आकर्षण असल्याने आपण कोणासही आपले म्हणणे पटवून देण्यात यशस्वी व्हाल. सरकारी क्षेत्रा कडून लाभदायी मार्ग मोकळे होऊन आपल्या खोळंबलेल्या योजना कार्यान्वित होतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना हा आठवडा चांगला असल्याची अनुभूती येईल. त्यांचे कामात मन लागेल, मात्र कामाच्या अतिरिक्त भारामुळे थोडा ताण वाढण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात समजूतदारपणा वाढेल. प्रेमीजनांना आपले प्रेम व्यक्त करण्याची संधी सुद्धा मिळेल. आपले आरोग्य उत्तम राहिले तरी सर्दी होण्याची शक्यता असल्याने काळजी घ्यावी. बांधकामाशी संबंधित कामात लाभ होईल.

हा आठवडा आपल्यासाठी नवीन सुरुवात घेऊन येत आहे. आपणास आपल्या बुद्धीचा परिचय देऊन आपली कामे कमीत कमी वेळेत पूर्ण करावी लागतील. असे केल्याने आपला वेळ वाचेल व उर्वरित वेळेत आपण नवीन काही करू शकाल. आपण आपल्या आवडीस महत्व द्याल व त्यामुळे ह्या आठवड्यात आपल्यातील सर्जनशीलतेचा परिचय होईल. आपण रुचकर भोजनाचा आस्वाद घ्याल. तसेच विश्रांती घेण्यासाठी सुद्धा वेळ काढाल. असे असले तरी आपणास आपल्या कामावर सुद्धा लक्ष द्यावे लागेल. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी सुद्धा हा आठवडा चांगला आहे, मात्र आपणास सहकार्यां पासून जपून राहावे लागेल. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा उत्तम आहे. आपल्या योजना यशस्वी होऊन आपणास लाभ होईल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी सुद्धा चांगला असून त्यांना अनेक प्रकारचे फायदे होतील. वैवाहिक जीवनातील तणाव कमी झाल्याने आपल्या मनास शांतता लाभेल. आपण कर्ज काढून एखादे नवीन काम सुरु कराल. आर्थिक स्थिती सामान्य राहिली तरी खर्चात कपात होईल. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. आपल्या बँकेतील गंगाजळीत वाढ झाल्याने आपली आर्थिक स्थिती मजबूत झाल्याचे आपणास जाणवेल. आपल्या प्रखर बुद्धिमत्तेमुळे आपण सर्व कामात आघाडीवर राहाल. आपण चांगले निर्णय घ्याल. ह्या आठवड्यात आपणास रुचकर भोजनाचा आस्वाद व उत्तम वस्त्रलाभ घेता येईल. आपण ब्रांडेड कपड्यांची खरेदी करू शकाल किंवा एखादे महागडे परफ्युम सुद्धा खरेदी करू शकाल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी खूपच चांगला आहे. आपल्या प्रणयी जीवनात रोमांस भरलेला असेल. विवाहितांचे वैवाहिक जीवन पूर्वीपेक्षा चांगले होऊन आपसात संवाद साधून एकमेकांचे हृदय जिंकण्यात यश प्राप्ती होईल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

आठवड्याच्या सुरुवातीस आपला कल व्यक्तिगत जीवन व प्रणय संबंध ह्याकडे असला तरी संबंधात सहजपणा असल्याचे आपणास जाणवणार नाही. ह्या दरम्यान आपणास जुने संबंध तोडण्याची व नवीन जोडण्याची इच्छा होईल. आपल्या इच्छांवर नियंत्रण न ठेवल्यास चुकीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या मध्यास एकांतात राहण्यास आपले प्राधान्य असेल. आठवड्याचे सुरवातीचे व अखेरचे दिवस व्यावसायिक क्षेत्रासाठी उत्तम आहेत. आठवड्याच्या मध्यास कामातून थोडी विश्रांती घेतल्यास किंवा आत्मपरीक्षण केल्यास हितावह होईल. त्याच बरोबर जीवनातील काही न उलगडलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे उचित ठरेल. आठवड्याच्या सुरवातीस एखादा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. असे असले तरी आठवड्याच्या मध्यास अचानकपणे खर्चात वाढ होण्याची सुद्धा शक्यता आहे. आठवड्याच्या सुरवातीस विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागले तरी इच्छित फल प्राप्तीसाठी त्यांना कठोर परिश्रम करावे लागतील. आठवड्याच्या अखेरीस आपल्याकडे एक नवीन ऊर्जा असेल व त्यामुळे आपण प्रत्येक आघाडीवर नवीन सुरुवात करण्यास तयार राहाल.

हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपले खर्च तर होतीलच शिवाय आपण त्याचा सुद्धा आनंद घ्याल. आपला आत्मविश्वास आपणास आपल्या कामात यश प्राप्त करून देईल. आपल्या प्रकृतीत सुधारणा होईल. वैवाहिक जीवनातील परस्पर संबंधात वाढ होईल, मात्र तणाव सुद्धा राहील. प्रेमीजनांना एखादी सुखद बातमी मिळेल. शैक्षणिक जीवनात केलेले प्रयत्न सार्थकी लागून आपणास आपल्या कष्टांचे यथोचित फल मिळेल. काही व्यक्तींचे आजारपण बळावून त्यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागण्याची शक्यता असल्याने त्यांनी योग्य ती काळजी घ्यावी. आठवड्याच्या सुरवातीस एखादा प्रवास संभवतो. आठवड्याच्या मध्यास कुटुंब व नोकरी ह्यात समतोल साधण्यास आपले प्राधान्य असेल. आठवड्याच्या अखेरीस आपणास चांगली प्राप्ती होण्याची शक्यता आहे.

हा आठवडा आपल्यासाठी महत्वाचा आहे. ह्या आठवड्यात आपणास प्राप्तीत वाढ करण्याचे अनेक मार्ग दिसून येतील व त्यामुळे आपली प्राप्ती वाढेल. आपणास व्यापारातून सुद्धा लाभ होईल. नोकरी करणाऱ्यांना सुद्धा काही चांगले लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या जातकांना आपल्या कामात यश प्राप्त होईल. वरिष्ठ आपल्यावर खुश होतील. प्रणयी जीवनात रोमान्स भरलेला असला तरी आपले मन बेचैन राहील. विवाहितांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपल्या समजूतदारपणामुळे संबंध अधिक दृढ होतील. आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित कराल व कार्यालयात आपल्या सोयीसाठी काही नवीन वस्तूंची खरेदी करू शकाल. आपणास आपल्या बुद्धीचा चांगला उपयोग होत असतो हि बाब आपण लक्षात ठेवावी. मात्र, निष्कारण इतरांच्या कामात हस्तक्षेप केल्याने आपले नुकसान सुद्धा होऊ शकते.

हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपण कोणतीही अशी गोष्ट सोडणार नाही कि ज्यात आपणास आनंद घेण्याची इच्छा होणार नाही. ह्या आठवड्यात आपली मनःस्थिती उंचावलेली असेल. त्याचा प्रभाव आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रावर होताना दिसून येईल. नोकरीतील कामगिरीत सुधारणा होईल. व्यापाऱ्यांना एखादी नवीन ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. बांधकाम होऊ शकेल. घराचे नूतनीकरण करू शकाल. वैवाहिक जीवन प्रेमाने भरलेले असेल. प्रेमीजन आपले नाते अधिक दृढ करण्यात कोणतीच कुचराई करणार नाहीत व त्याचा त्यांना लाभ सुद्धा होईल. दीर्घ पल्ल्याच्या प्रवासास जाऊ शकाल. हा प्रवास एखाद्या धार्मिक ठिकाणाचा किंवा आपल्या जुन्या गावाचा सुद्धा असू शकतो. प्रवासासाठी आठवड्याचे अखेरचे दिवस अधिक अनुकूल आहेत. आपणास आपल्या कार्यालयात काही सुविधा मिळण्याची संभावना आहे, ज्यात एखाद्या म्युझीक सिस्टमचा समावेश सुद्धा असू शकतो.

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. ह्या आठवड्यात आपणास मानसिक ताण दूर करण्याचा प्रयत्न करावा लागेल. तसेच स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. आपली प्रकृती उत्तम राहिल्याने आपण अवघड आव्हानांना सामोरे जाऊन प्रगती साधाल. आपले कौशल्य आपल्या कामी येईल व त्यामुळे आपणास नोकरीत चांगले फल मिळेल. ह्या आठवड्यात व्यापाऱ्यांना सुद्धा चांगले परिणाम मिळतील. आपली व्यापार वृद्धी होईल व त्यामुळे मोठा फायदा सुद्धा होईल. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात गुळगुळीतपणा जाणवेल. प्रेमीजनांच्या जीवनात काही समस्या निर्माण होतील, परंतु त्या दूर करण्याचा प्रयत्न सुद्धा ते करतील. आपणास सासुरवाडी कडील लोकांशी नीट वागावे लागेल. आपल्या वैयक्तिक गोष्टी कोणास सांगू नयेत.

हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आपणास आपला आळस झटकून खूप कष्ट करावे लागतील. असे केल्यानेच आपणास परिणाम मिळू शकतील. व्यापारास गती येईल, मात्र आपणास अधिक कष्ट करावे लागतील. आपण आपल्या बुद्धिमतेच्या जोरावर बाजारावर आपली पक्कड जमविण्यात यशस्वी व्हाल. नोकरी करणाऱ्या जातकांनी मिळालेल्या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करून आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे. वायफळ गोष्टीत वेळ दवडू नये. वैवाहिक जीवनात चढ - उतार येतील. प्रेमीजनांना ह्या आठवड्यात मोकळेपणा मिळेल. आपली प्रियव्यक्ती आपल्यावर खुश होईल. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

हा आठवडा आपणास चांगला जाण्याकडे अंगुली निर्देश करत आहे. आपणास आपल्या कौटुंबिक जवाबदाऱ्या समजल्याने घरगुती जीवनासाठी सुद्धा आपण वेळ काढाल. नोकरी करणाऱ्या जातकांना आपल्या कामात चांगले परिणाम मिळतील. आपली कार्य योजना व कामाची शैली आपल्या वरिष्ठांच्या पसंतीस उतरेल व त्यामुळे आपणास चांगले परिणाम मिळतील. ह्या आठवड्यात व्यापाऱ्यांना चांगला फायदा होईल. आपण आपल्या भागीदारासह त्याचा उत्सव सुद्धा साजरा कराल. वैवाहिक जीवनात आनंद पसरेल. वैवाहिक जोडीदारासह एखाद्या मेजवानीस जाऊ शकाल. प्रेमीजनांसाठी सुद्धा हा आठवडा चांगला आहे. आपल्या प्रिय व्यक्तीस भेटण्याच्या अनेक संधी मिळतील. तसेच आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्याची संधी सुद्धा मिळेल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत. ह्या आठवड्यात आपल्या प्राप्तीत वाढ होऊन खर्चात कपात होईल.

हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपणास आपले नातेवाईक व मित्रांच्या सहवासात वेळ घालविण्याची संधी मिळेल. काही नवीन मित्र व लोकांची भेट संभवते. काही नवीन मित्र होतील व आपले सामाजिक स्तर उंचावेल. आपली प्रतिमा हळू हळू लोकप्रिय होऊ लागेल. लोक आपणास पसंत करू लागतील. आपण लोकांना आपल्याकडे आकर्षित करू शकाल. आपण लोकांना कामाच्या बाबतीत योग्य सल्ला द्याल. नोकरी करणाऱ्या जातकांना आपल्या कष्टांचे यथोचित फल मिळेल. नोकरीत एखादी चांगली बातमी ऐकिवात येईल. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा उन्नतीदायी आहे. मात्र आपल्या खर्चात वाढ झाल्याने आपल्या भुवया उंचावतील. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात आनंद पसरेल. प्रेमीजनांना मात्र सावध राहावे लागेल.

हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आठवड्याच्या सुरुवातीस आर्थिक प्राप्ती कशी असावी ह्यावर आपले लक्ष केंद्रित असेल. आपण बँकेतील गंगाजळी वाढवू शकाल. कौटुंबिक जवाबदाऱ्या पूर्ण करू शकाल. मन प्रसन्न राहील. सर्वांशी मिळून मिसळून राहाल. मित्रांशी गप्पा मारण्याची संधी मिळेल. आपसातील संबंध दृढ होतील. वैवाहिक जीवनावर लक्ष केंद्रित कराल. वैवाहिक जोडीदारास खुश कराल. आपले वैवाहिक जीवन सुखद होईल. प्रेमीजनांना सुखद क्षण अनुभवता येतील. आपल्या प्रिय व्यक्तीस खुश ठेवण्यासाठी एखादी चांगली भेटवस्तू आपण द्याल. नोकरी करणाऱ्या जातकांना आपल्या कामात यश प्राप्त होईल. विरोधकां पासून सावध राहावे. व्यापारी वर्गाने आपल्या कामाकडे लक्ष द्यावे. करचोरी करण्या पासून त्यांनी दूर राहावे. असे केल्यानेच आपला फायदा होईल व आपण त्रासा पासून दूर राहू शकाल. आठवड्याच्या मध्यास एखादा प्रवास संभवतो.