आठवड्याचे राशीभविष्य : 3 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर 2021, अचानक धनलाभ होणार, प्रतिष्ठा वाढणार; 'या' राशीसाठी आठवडा असणार शुभ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 11:50 AM2021-10-04T11:50:52+5:302021-10-04T12:41:08+5:30

Weekly Horoscope 3 October to 9 October 2021 : कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आपण आपल्या संतती विषयी अतिशय विचार मग्न राहाल. त्यांच्या भविष्याची चिंता आपणास त्रासदायी होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. एखाद्या सरकारी नोकरीसाठी आपली निवड होण्याची शक्यता आहे. आपले आरोग्य चांगले न राहिल्याने आपण आपली काही कामे स्थगित कराल. ह्या आठवड्यात नोकरी करणाऱ्या जातकांनी आपल्या वरिष्ठांशी मोकळेपणाने संवाद साधून ज्या समस्यांना आपण सामोरे जात आहात त्यांची माहिती करून द्यावयास हवी. ते आपले म्हणणे ऐकून घेऊन आपणास मदत सुद्धा करतील. सरकारी क्षेत्राकडून आपणास एखादा लाभ मिळण्याची शक्यता आहे. आपण सतत सुखाच्या शोधात राहाल. त्यासाठी लागणारा पैसा सुद्धा खर्च कराल.

ह्या आठवड्यात आपण अत्यंत आनंदात राहाल. आपल्या कुटुंबाच्या प्रगतीने आपण अत्यंत खुश व्हाल. त्यामुळे अधिक चांगले काम करण्याची आपणास प्रेरणा मिळेल. आपण वैवाहिक जीवनाचा आनंद घेऊ शकाल. प्रेमालापाच्या इच्छेने आपला वैवाहिक जोडीदार आपणास प्रेरित करेल. प्रेमीजनांनी आपल्या प्रेमाच्या खरेपणावर विश्वास ठेवावा. वायफळ गोष्टीतून बाहेर पडून प्रणयी जीवनात प्रगती करावी. व्यापारासाठी आपण केलेले प्रयत्न सार्थकी लागतील. सरकारी क्षेत्राकडून लाभ होण्याचा मार्ग मोकळा होईल. आपण आपले कर्ज फेडू लागल्याने थोडा दिलासा अवश्य मिळेल. हा आठवडा नोकरी करणाऱ्या जातकांसाठी अनुकूल आहे. आपण आपल्या कामावर लक्ष देऊ शकाल. आपल्या प्रकृतीत सुधारणा होऊन समस्येतून आपण मुक्त व्हाल.

हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण एखाद्या प्रवासाचे आयोजन कराल. हा प्रवास आपल्या कामा निमित्तच असू शकतो. त्यासाठी आपणास खूप प्रयत्न करावे लागतील व त्यात भरपूर खर्च सुद्धा होईल. परंतु आपण जर हा प्रवास केलात तर आपणास त्याचा मोठा फायदा सुद्धा होईल. हा आठवडा नोकरी करणाऱ्या जातकांसाठी खूप कष्ट करण्याचा आहे. आपणास कामाचे समाधान लाभले नाही तरी ग्रहस्थिती विशेष अनुकूल नसल्याने आपण आपली कामे करतच राहावे. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा अनुकूल असून आपणास आपल्या व्यवसायातील काही नवीन गोष्टी शिकावयास मिळतील, ज्या शिकून घेतल्याने आपण आपल्या व्यापारास गती देऊ शकाल. आपले आरोग्य उत्तम राहील. कुटुंबात सुद्धा एखादी शुभ व मंगलमय परिस्थिती निर्माण होईल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी विशेष अनुकूल नाही.

आठवड्याच्या सुरवातीस आपणास कामाची घाई असेल. आपण आपले विचार सभोवतालच्या लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न कराल. आपणास आपले नातेसंबंध अधिक काळजीपूर्वक सांभाळावे लागतील. विशेषतः ह्या आठवड्यात आपल्या प्रणयी जीवनात काही समस्या उदभवतील, ज्या आपली परीक्षा घेणाऱ्या असतील. हा आठवडा अत्यंत संवेदनशील होऊ शकतो. आपणास नात्यातील विविध पैलू गंभीरतेने समजून घ्यावे लागतील. आपल्या आरोग्यावर ऋतू बदलाचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. हळू हळू आपल्या स्थितीत सुधारणा होऊ लागेल. आठवड्याच्या अखेरीस आपण कारकीर्द उंचावण्याचा प्रयत्न कराल. उत्तरार्धात आपणास काही लाभ होण्याची शक्यता आहे. विवाहेच्छुकांचे विवाह ठरण्याची संभावना आहे. ह्या आठवड्यात व्यावसायिक उद्दिष्ट पूर्तीसाठी प्रवास होऊ शकतो.

हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपण स्वतःचा विचार करून त्यासाठी पैसा सुद्धा खर्च कराल. त्यामुळे आपले व्यक्तिमत्व खुलून उठेल. काही नवीन कपड्यांची खरेदी सुद्धा संभवते. आठवड्याच्या सुरवातीस आपल्या आत्मबलात वाढ होईल. आपणास कामात यश प्राप्त होईल. कौटुंबिक समस्येने आपण काहीसे त्रस्त व्हाल, परंतु त्यातून बाहेर पडण्याची कला आपणास अवगत आहे. व्यापाराच्या बाबतीत आपणास चांगले परिणाम मिळतील. हा आठवडा नोकरी करणाऱ्या जातकांसाठी सुद्धा चांगला आहे. अनुकूल परिणाम मिळाल्याने आपले मन हर्षित होईल. वैवाहिक जीवनातील प्रेम वृद्धिंगत होईल. मात्र, वैवाहिक जोडीदार आजारी पडण्याची शक्यता असल्याने आपणास त्यांची काळजी घ्यावी लागेल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. आपल्यातील प्रेम वृद्धिंगत होईल. आपली प्रिय व्यक्ती आपणास त्यांच्या कुटुंबियांशी ओळख करून देण्याची शक्यता आहे. त्यामुळे नात्यात प्रगती होईल. आपले आरोग्य उत्तम राहिल्याने आपण आणखीनच तंदुरुस्त व्हाल.

ह्या आठवड्याची सुरवात आपल्यासाठी सामान्यच असेल. त्या दरम्यान आपण एखाद्या प्रवासात असाल. ह्या प्रवासा दरम्यान आपणास काही नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळेल. त्यात सुद्धा एखाद्या खास व्यक्तीशी परिचय वाढण्याची शक्यता आहे. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. त्यांना आपल्या प्रणयी जीवनात प्रगती करण्याची संधी मिळेल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात शांतता नांदेल. अधून - मधून आपल्या वागणुकीमुळे आपला वैवाहिक जोडीदार दुखावला जाण्याची शक्यता असल्याने आपण स्वतःवर नियंत्रण ठेवावे. नोकरी करणाऱ्या जातकांना आपल्या कामासाठी एखाद्या नवीन व्यक्तीच्या हाताखाली राहावे लागू शकते. व्यापाऱ्यांना कायद्याच्या चौकटीत राहून कामे करावी लागतील, अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागतील. आपले आरोग्य सामान्यच राहील. ऋतुगत विकारांप्रती सतर्क राहावे लागेल.

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपल्या प्राप्तीत वाढ होईल. परंतु आठवड्याच्या मध्यास खर्च वाढतील. परिस्थिती हाता बाहेर जाऊ नये म्हणून आपणास खर्चांवर लक्ष ठेवावे लागेल. आठवड्याचे अखेरचे दिवस खूपच चांगले आहेत. आपण स्वतःवर लक्ष द्याल. आपले वैवाहिक जीवन अधिक सुखद होण्यासाठी काय काय करावे लागेल ह्यावर लक्ष द्याल. वैवाहिक जोडीदाराची प्रकृती बिघडण्याची शक्यता असल्याने त्यांची काळजी घ्यावी. प्रेमीजनांना विशेष फायदा संभवतो. आपण एखाद्या सामाजिक सेवा कार्यात सहभागी व्हाल व त्यामुळे आपली प्रशंसा होऊन आपण लोकप्रिय सुद्धा होऊ शकाल. आपले आरोग्य उत्तम राहील. आपण धन संचयाचा प्रयत्न सुद्धा कराल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी सामान्य असला तरी नोकरी करणाऱ्या जातकांसाठी चांगला आहे.

हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. आपण आपल्या कामावर लक्ष देऊ शकाल. त्यामुळे कामावरील आपली पकड अधिक मजबूत होईल. आपले वरिष्ठ आपल्यावर खुश होऊन आपली पदोन्नती करण्याचा विचार करतील. आपले वरिष्ठ आपल्यावर नाराज झाल्याने आपल्या समस्या वाढू नयेत म्हणून एकही कटू शब्द उच्चारू नका. व्यापारासाठी केलेले प्रवास यशस्वी झाल्याने आपल्या व्यापारास गती येईल. व्यापारातून मोठा लाभ सुद्धा होईल. आपण मनातून खुश झाल्याने मनात प्रेम भावना निर्माण होईल. त्यामुळे आपले वैवाहिक जीवन अधिक दृढ होईल. आपण आपल्या वैवाहिक जोडीदारासह बाहेर फिरावयास जाऊ शकाल. एखाद्या रमणीय ठिकाणी फिरावयास जाऊन आपल्या नात्यास पुन्हा तजेला देण्याची संधी मिळेल. प्रेमीजनांच्या जीवनात समस्या येऊन सुद्धा नात्यात सुधारणा झाल्याने आनंद पसरेल. आपणास प्रिय व्यक्तीशी संपर्कातील अंतर वाढणार नाही ह्याची दक्षता घेऊन त्यांच्या संपर्कात राहावे लागेल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. आपणास आपल्या कष्टांचे फल मिळेल. दूरवरचे प्रवास संभवतात. ह्या प्रवासामुळे आपणास काही नवीन विचार सुचतील व त्यामुळे आपल्या जीवनास वेगळी दिशा मिळेल. नोकरी करणारे जातक कामाचा आनंद घेऊ शकतील. त्यांची कामगिरी उत्तम होईल. हा आठवडा त्यांच्यासाठी अत्यंत अनुकूल असेल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी सामान्य फलदायी आहे. बाजारात कोणत्या वस्तुंना मागणी आहे ह्याकडे आपणास लक्ष देऊन त्यानुसार आपल्याला कार्यरत राहावे लागेल. खर्चात वाढ होईल. सुख सोयींचा आनंद घेता येईल. आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक जीवनात काही आव्हानांना सामोरे जावे लागेल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण दूरवरच्या प्रवासास जाऊ शकाल.

हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा असेल. आपणास आपली प्राप्ती नियमित करण्याचा विचार करावा लागेल. आपण त्या दिशेने प्रयत्न कराल व हळू हळू आपणास त्यांचे चांगले परिणाम मिळण्याची सुरवात होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना त्यांच्या वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. कामात प्रगती होईल. आपले आचरण नीतिमत्तेला धरून असेल. लोकहितासाठी वेळ काढून त्यासाठी पैसा सुद्धा खर्च कराल. फुटकळ खर्चात मात्र कपात होईल. व्यापार विस्तार शक्य होईल. नवीन योजनांना आकार द्याल. वैवाहिक जीवनात शांतता नांदून आपणास सुख प्राप्त होईल. प्रेमीजनांना प्रेमालापाची संधी मिळेल. इतकेच नव्हे तर आपण आपल्या प्रिय व्यक्तीस एखादी चांगली भेटवस्तू सुद्धा देऊ शकाल. आठवड्याच्या दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी आपण एखाद्या प्रवासास जाऊ शकाल.

हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण आपल्या वैवाहिक जीवनात आनंदित होऊन आपल्या मनातील भावना आपल्या जोडीदाराकडे व्यक्त कराल. त्यामुळे नात्यातील गोडवा वाढेल व जोडीदार सुद्धा काही कमी पडू न देता आपणास खुश करेल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. काही लोकांची दृष्ट आपल्या नात्यास लागू शकते. हा आठवडा नोकरी करणाऱ्या जातकांसाठी चांगला आहे. आपण आपले कामच करत राहावे. वायफळ चर्चा व इतरांच्या कामात हस्तक्षेप करण्यापासून दूर राहणे हितावह होईल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी सामान्यच आहे. आपणास लक्षपूर्वक आपली कामे करावी लागतील. करचोरी करण्या पासून दूर न राहिल्यास त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागू शकतील. आरोग्य थोडे नाजूक राहील. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

ऑक्टोबर महिन्याचा हा पहिला आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण आपल्यातील दोष दूर करण्याचा प्रयत्न कराल. त्यामुळे आपणास आपल्यातील बदल जाणवेल. आठवड्याच्या मध्यास आपण प्रबळ व्हाल. आपली व्यापारातील कामगिरी उत्तम होईल. ह्या कामगिरीमुळे आपला नफा सुद्धा चांगला होईल. आपल्या प्राप्तीत सुद्धा वाढ होईल. लोकांच्या तोंडी आपलेच नाव असेल. त्यामुळे आपण आनंदित व्हाल व आपला आत्मविश्वास वाढेल. आपल्या व्यापार वृद्धीसाठी कुटुंबीयांची मदत होईल. नोकरी करणारे जातक आपली कामे लक्षपूर्वक करतील, त्यामुळे त्यांची गणना चांगल्या लोकात होईल. आपल्या कामगिरीने वरिष्ठ प्रभावित होऊन ते आपणास पाठिंबा देतील. आरोग्य उत्तम राहिल्याने कोणतीही समस्या उदभवणार नाही. कुटुंबिय सहकार्य करतील. प्रणयी जीवन सामान्यच राहील. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत. आठवड्याच्या उत्तरार्धात प्रवास करणे मात्र टाळावे.