आठवड्याचे राशीभविष्य : 17 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर 2021; 'या' राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल, कामात पदोन्नती होईल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 10:17 AM2021-10-19T10:17:00+5:302021-10-19T10:20:02+5:30

Weekly Horoscope 17 October to 23 October 2021 : कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

हा आठवडा आपल्यासाठी आनंदाने भरलेला आहे. आपल्या प्राप्तीत सतत वाढ झाल्याने आपल्या आनंदात भर पडेल. प्रेमीजनांनी आपल्या प्रियव्यक्ती जवळ आपल्या मनातील भावना मोकळेपणाने व्यक्त कराव्यात. आपला प्रस्ताव त्यांना स्वीकार्य होऊन ते आपल्याशी विवाह बंधनाने जोडले जाण्याची शक्यता आहे. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात काही तणाव निर्माण होण्याची संभावना आहे. व्यापाऱ्यांनी सध्या कोणताही मोठा निर्णय घेऊ नये. नोकरी करणाऱ्या जातकांनी आपल्या ज्ञानाचा यथोचित वापर करून कामास सुलभ बनविण्याचा प्रयत्न करावा. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत, मात्र आठवड्याच्या मधल्या दिवसात प्रवास टाळावेत.

हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपण आपल्या कामात प्रगती करू शकाल. आपणास प्रत्येक काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची इच्छा झाल्याने आपण मन लावून कामे कराल. असे केल्याने आपणास नोकरीत चांगले परिणाम मिळतील व वरिष्ठ आपल्यावर खुश होतील. आपल्या प्राप्तीत सुद्धा वाढ होईल. व्यापाऱ्यांना एखादा नवीन व्यापारी प्रस्ताव खूप फायदेशीर ठरू शकेल. असा व्यापारी प्रस्ताव आपणास खूपच उपयुक्त होऊ शकतो. वैवाहिक जीवनात आनंद पसरेल. प्रेम व रोमांस वाढेल. प्रेमीजनांना ह्या आठवड्यात थोडा दिलासा मिळेल. आपल्यातील गैरसमज दूर होऊ लागतील. आपल्या प्रकृतीत सुधारणा होऊन समस्या दूर होतील. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत. आठवड्याच्या मध्यास आपल्या खर्चात वाढ होण्याची संभावना आहे. काहीजणांना परदेशी जाण्यात यश प्राप्त होईल. विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळतील.

हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आपणास आपले प्रयत्न वाढविल्यासच आपली प्राप्ती व खर्च ह्यात समतोल साधता येईल. वाढत्या खर्चानी आपण त्रस्त व्हाल, मात्र हे खर्च वायफळ असल्याने आपणास त्यावर लक्ष ठेवावे लागेल. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा आठवडा चांगला आहे. त्यांचा आत्मविश्वास वाढेल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी सुद्धा चांगला आहे. आपल्या व्यापारासाठी मदतरूप होऊ शकेल अशी एखादी चांगली बातमी परदेशातून येण्याची संभावना आहे. कौटुंबिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबियांचे आरोग्य सुद्धा उत्तम राहील. विवाहितांच्या वैवाहिक जीवनातील तणाव कमी होतील. आपला जोडीदार कुटुंब व सासुरवाडी ह्यात समतोल साधण्यात यशस्वी झाल्याने परिस्थिती अधिक चांगली होईल. आपल्या जीवनात जी काही कमतरता होती ती आता दूर होईल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा आव्हानात्मक आहे. ग्रहस्थितीच्या प्रतिकूलतेमुळे आपल्या नात्यात सतत काही ना काही कारणाने भांडण होण्याची शक्यता असल्याने आपणास शांत राहण्याचा प्रयत्न करावा लागेल. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

आठवड्याच्या सुरवातीस नवीन शत्रुत्व निर्माण होण्याची शक्यता असल्याने आपणास सतर्क राहावे लागेल. आपल्या वागणुकीमुळे कोणी दुखावणार नाही ह्याची काळजी सुद्धा घ्यावी लागेल. आपण काही बचत केली असेल तर ह्या बचतीच्या पैश्यांची गुंतवणूक विचारपूर्वक करावी. शक्य असल्यास ह्या आठवड्यात कोठेही आर्थिक गुंतवणूक करणे टाळावे. नात्यातील कोणत्याही प्रकारचा असंतोष नाते संपुष्ट करू शकतो. आठवड्याच्या मध्यास आपणास मानदुखी किंवा कंबरदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे. ह्या व्यतिरिक्त आठवड्याच्या अखेरीस दंत विकार होण्याची संभावना आहे. नोकरी करणाऱ्या जातकांना अतिरिक्त कष्ट करून सुद्धा पदोन्नतीत होणाऱ्या विलंबास सामोरे जावे लागेल. कोणाशीही अनावश्यक गप्पा किंवा वाद घालू नये. आपल्या शत्रूंवर नजर ठेवावी. तसेच नवीन लोकांशी वाद घालू नये. आठवड्याच्या अखेरीस आपण मुले किंवा प्रियजन ह्यांच्याशी असलेल्या संबंधांवर अधिक लक्ष द्याल. विद्यार्थ्यांसाठी आठवड्याचे सुरवातीचे दिवस अनुकूल असून त्या नंतरच्या दिवसात त्यांना आपली मेहनत वाढवावी लागेल.

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याची सुरवात खूपच चांगली होईल. वैवाहिक सौख्यात वाढ होईल. आठवड्याच्या मध्यास आपण काहीसे चिंताग्रस्त झाल्याने आपल्यातील ऊर्जा कमी होईल. असे झाल्याने कामात समस्या निर्माण होऊन आपली कामे अपूर्ण राहण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या अखेरीस काही चांगले परिणाम प्राप्त होतील. नोकरीत आपले कष्ट करणे चालूच राहील. व्यापाऱ्यांना आपला व्यवसाय समजून घेण्यास अजून वेळ लागेल. एखाद्या तज्ञ व्यक्तीचा सल्ला घेतल्यास यशस्वी होण्याची शक्यता वाढेल. कौटुंबिक सुख - शांतता वृद्धिंगत होईल. कुटुंबीय आपल्या कामात आपणास सहकार्य करतील. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. विद्यार्थ्यांना आपली योग्यता सिद्ध करण्याची संधी मिळेल. आपले आरोग्य उत्तम राहील.

हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला व महत्वाचा आहे. ह्या आठवड्यात आपण काही नवीन कामे हाती घ्याल, ज्यात मिळालेले यश आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे असेल. आठवड्याच्या सुरवातीस आपण दूरवरच्या प्रवासास जाऊ शकाल. ह्या प्रवासातून आपणास काही चांगले अनुभव घेता येतील. नोकरी करणाऱ्या जातकांची कामात प्रगती होईल. त्यांच्या कामाची प्रशंसा होईल. आपले वरिष्ठ सुद्धा आपल्या कामगिरीने प्रभावित होतील. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी सुद्धा चांगला आहे. व्यापारास गती येऊन नफ्यात वाढ होईल. आपल्या खर्चात कपात तर प्राप्तीत वाढ होईल. आपणास सरकारी क्षेत्रा कडून सुद्धा मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. आपण जर मित्रां बरोबर काम करत असाल तर त्या कामात आपणास मित्रांची सुद्धा चांगली मदत होईल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात आपसातील संवाद वाढतील. हा आठवडा प्रेमीजनांसाठी सुद्धा चांगला आहे.

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण आपल्या प्रणयी जीवनासाठी वेळ काढून आपल्या प्रिय व्यक्तीच्या भावना समजून घ्याल. आठवड्याच्या मध्यास खर्चात वाढ होईल. ह्या दरम्यान आपणास विरोधकांच्या कारवायांना सामोरे जावे लागेल. अशा परिस्थितीत आपण शांत राहिल्यास व धीर धरल्यास त्यांच्यावर मात करू शकाल. आठवड्याच्या अखेरीस आपण आपल्या वैवाहिक जीवनावर लक्ष केंद्रित कराल. व्यापारी आपल्या व्यापारवृद्धीचा विचार करू लागतील. नोकरी करणारे जातक मेहनत करून आपल्या बुद्धिमत्तेच्या व निष्ठेच्या जोरावर आपल्या कामात चांगली सुधारणा करू शकतील. त्यामुळे त्यांचाच फायदा होईल. आपल्या प्राप्तीत व आत्मविश्वासात वाढ होईल. आरोग्य उत्तम राहील.

हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपण आपल्या नोकरीवर लक्ष केंद्रित करून आपली कामगिरी अधिक चांगली करण्यासाठी प्रयत्नशील राहाल. त्यामुळे आपली नोकरीतील स्थिती अधिक मजबूत होईल. आपण कामाचा आनंद घेऊ शकाल. व्यापाऱ्यांना दूरवरच्या व्यापारी संबंधातून मोठा लाभ होईल. व्यापारा निमित्त आपण भरपूर प्रवास कराल. आपले मित्र आपल्या कामात आपणास सहकार्य करू शकतील. आपले आरोग्य उत्तम राहील. आपल्या मनात रोमांस करण्याची भावना निर्माण झाल्याने आपले वैवाहिक जीवन सुखद होईल. आपल्यातील जवळीक व एकमेकांप्रती आकर्षण वाढेल. कुटुंबात एखादे शुभ कार्य होण्याची शक्यता आहे. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. आपण आपल्या प्रिय व्यक्तीसह एखादा प्रवास करण्याची शक्यता आहे. ह्या व्यतिरिक्त काहीजणांना नवीन मित्र बनविण्याची संधी सुद्धा मिळेल. आठवड्याच्या मध्यास आपल्या प्राप्तीत वाढ होईल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. आपण विश्वासपूर्वक जास्तीत जास्त कामे स्वतः करण्याचा प्रयत्न कराल. त्यामुळे आपला आत्मविश्वास सुद्धा वाढून कामे यशस्वी होतील. अडथळ्यां पासून मुक्तता होईल. नशिबाची साथ मिळेल. कामात पदोन्नती संभवते. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा आठवडा एखाद्या वरदाना सारखाच असेल. आपण जी कामे कराल त्यात यशस्वी व्हाल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी सुद्धा चांगला आहे. विवाहितांना वैवाहिक जीवनाचे सौख्य प्राप्त होईल. आपण आपल्या वैवाहिक जोडीदारासह एखाद्या रमणीय ठिकाणी फिरावयास जाऊ शकाल. प्रेमीजनांना इतर कामातून वेळ काढून आपल्या प्रिय व्यक्तीच्या सहवासात वेळ घालवावा लागेल. असे करण्याची आपल्या प्रणयी जीवनास आवश्यकता आहे. आपल्या प्रिय व्यक्तीस आपल्या सहवासाची नितांत गरज आहे. आपली प्रकृती उत्तम राहील. आपण स्पष्टवक्ता व्हाल. लोक आपल्याकडून खूप अपेक्षा ठेवतील. कुटुंबियांमुळे आपणास फायदा होईल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आपली बँकेतील शिल्लक वाढेल. कामात यश प्राप्त होईल. आपली ऊर्जा आपणास प्रत्येक कामात अग्रस्थानी ठेवेल व त्यामुळे आपली वेगळी ओळख निर्माण होईल. आपल्या कार्यालयात कोणालाही निष्कारण त्रास देऊ नका. तसे केल्यास आपलेच नुकसान होण्याची संभावना आहे. तसे पाहू गेल्यास आपले काम चांगलेच होईल. आपल्या कामात कोणाचाही हस्तक्षेप आपणास सहन होणार नाही. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी सामान्य फलदायी आहे. आपणास आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल. विवाहितांना वैवाहिक जीवनात सुखद अनुभव येतील. नात्यात एकनिष्ठता व आपलेपणा विकसित होऊन नाते अधिक दृढ होईल. प्रेमीजनांना आपल्या प्रणयी जीवनाचा आनंद उपभोगण्याची संधी मिळेल. आठवड्याच्या मध्यास आपण प्रवास करू शकता.

हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आपला आत्मविश्वास वाढल्याने व प्रकृती सुदृढ झाल्याने आपणास कामात यश प्राप्त होईल. अधून - मधून मोठा शारीरिक त्रास होणार नसला तरी लहान - सहान समस्या उदभवण्याची शक्यता असल्याने आरोग्याची काळजी घ्यावी. आपल्या सासुरवाडी कडील लोकांशी वाद होण्याची शक्यता असल्याने शांत राहण्याचा प्रयत्न करावा. वैवाहिक जीवन सामान्यच राहील. आपला वैवाहिक जोडीदार एखाद्या प्रवासाचे आयोजन करण्याची शक्यता आहे. प्रेमीजनांनी ह्या आठवड्यात सावध राहण्याची गरज आहे. आपल्या दोघात मतभेद होण्याची शक्यता असल्याने एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. कौटुंबिक जीवन शांततेत व्यतीत होईल. नोकरी करणारे जातक कामाचा आनंद घेऊ शकतील. तसेच ते आपली कामे बिनचूक करू शकतील. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. आपणास प्रवास करून एखादा फायदेशीर सौदा करता येईल. प्राप्तीत थोडी वाढ होईल. आठवड्याचा अखेरचा दिवस प्रवासासाठी अनुकूल आहे.

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपली आर्थिक स्थिती काहीशी नाजूक होण्याची शक्यता असल्याने आपणास आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करावी लागेल. आठवड्याचे मधले दिवस उत्तम आहेत. खर्चात कपात व प्राप्तीत वाढ होईल. आठवड्याच्या उत्तरार्धात बँकेत पैसे जमा करू शकाल. कौटुंबिक जीवनात आनंद पसरेल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात छोटे - छोटे वाद उदभवले तरी नात्यातील गोडवा टिकून राहील. प्रेमीजनांनी आपले नाते अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करावा. आपल्या प्रिय व्यक्तीचे हृदय जिंकण्यासाठी प्रयत्नशील राहावे. इमानदारीने प्रयत्न केल्यास आपण त्यात यशस्वी होऊ शकाल. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे यथायोग्य फल मिळेल. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.