Where इज वसंत मोरे?; मनसे वर्धापन दिन सोहळ्यातील प्रश्नाला मिळालं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 10:46 AM2023-03-10T10:46:47+5:302023-03-10T10:53:20+5:30

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मनसेचा १७ वा वर्धापन दिन ठाण्यातील एका सभागृहात पार पडला. यावेळी, राज ठाकरेंनी १७ वर्षांतील प्रवासाचा थोडक्यात अनुभव सांगताना पदाधिकारी, नेते आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याचं काम केलं.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मनसेचा १७ वा वर्धापन दिन ठाण्यातील एका सभागृहात पार पडला. यावेळी, राज ठाकरेंनी १७ वर्षांतील प्रवासाचा थोडक्यात अनुभव सांगताना पदाधिकारी, नेते आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याचं काम केलं.

अनेक गोष्टीतून पक्ष जात असतो. आपण सत्तेपासून आपण दूर नाही आहोत, हे मळभ लवकरच दूर होईल, असे राज यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. मनसेच्या या कार्यक्रमाला राज्यभरातून मनसैनिक आले होते,

त्यात पुण्यातील मनसेचे नगरसेवक वसंत मोरे हेही हजर होते. दरम्यान, वसंत मोरे आले का नाही, या प्रश्नाचं मिळालेलं हे उत्तर आहे, असे स्वत: मोरे यांनीच सांगितलंय.

मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे यांची ठाण्यात जाहीर सभा झाली. यावेळी राज ठाकरे यांनी मनसेच्या आतापर्यंतच्या आंदोलनाची माहिती देणारी पुस्तिका जारी केली.

यात मनसेच्या आतापर्यंतच्या सर्व आंदोलनाची ख सविस्तर माहिती दिली आहे. दरम्यान, मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांच्या नावाची आणि त्यांच्या मनसेतील नाराजीची सातत्याने चर्चा होत असते.

त्यामुळे, ठाण्यातील वर्धापन दिनाच्या सोहळ्याला वसंत मोरे आले की नाही, याचीही चर्चा रंगली होती. त्यावर, आता स्वत: वसंत मोरे यांनीच फोटो शेअर करत उत्तर दिलंय.

वसंत मोरे यांनी ट्विटरवरुन मनसेच्या वर्धापन दिन सोहळ्यातील फोटो शेअर केले आहेत. आपण, या कार्यक्रमात कुठे आणि कोणासोबत बसलो होतो, हेही मोरेंनी सांगितलंय.

''आज वर्धापन दिनामध्ये चर्चा होती Where is Vasant More, Here is Vasant More! आणि शेजारी पण नीट बघा कोण होते ..'', असे ट्विट वसंत मोरेंनी केलंय. मोरेंच्या या ट्विटमध्ये मनसेचे युवा नेते आणि राजपुत्र अमित ठाकरे दिसत आहेत.

अमित ठाकरेंसोबतच्या रांगेत वसंत मोरे बसले होते. त्यामुळे, आपण आजही मनसेतच आणि राज ठाकरेंच्या जवळ असल्याचं मोरेंनी ट्विट करुन सांगितलंय.