३४ वयातच ही सुंदर तरुणी झाली एका देशाची पंतप्रधान, एका ट्वीस्टमुळे मिळाली तिला संधी!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2020 12:20 PM2020-02-06T12:20:00+5:302020-02-06T13:40:40+5:30

सना मरीन

34 वर्षाच्या सना यांच्याकडे जगातील सर्वात कमी वयातल्या पहिल्या पंतप्रधान म्हणून संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं गेलं

एप्रिल 2019 मध्ये अँण्टी रिने हे फिनलंडचे पंतप्रधान . पण गेल्या महिन्यात फिनलंडमध्ये झालेल्या पोस्ट कर्मचा-यांचा संप चुकीच्या पद्धतीनं हाताळल्यानं संपूर्ण देशात आणि फिनलंडच्या राजकारणात पंतप्रधान रिने यांच्याविरुद्ध संतापाची लाट उसळली. यातूनच रिने यांनी आपल्या सहकारी पक्षांचा विश्वासही गमावला.

सोशल डेमॉक्रेटिक पक्षातून पंतप्रधानपदासाठी नवीन चेह-याचा शोध सुरू झाला. हा शोध घेताना खूप झगडावं लागलं नाही. वाहतूक आणि संपर्क मंत्री असलेल्या सना मरीन यांची पक्षानं आपला नेता म्हणून निवड केली. आणि त्या फिनलंडच्या पंतप्रधान झाल्या.

१० डिसेंबर २०१९ रोजी सना मरीन यांनी फिनलँडच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हातात घेतली

फिनलंडमधील सामाजिक आणि राजकीय वातावरण तापलेलं असतानाच सना मरीन यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला

16 नोव्हेंबर 1985 रोजी हेलिसंकीमध्ये जन्म झालेल्या सना या त्या घरातील एकमेव अपत्य आहे

त्यांच्या कुटुंबातली उच्चशिक्षण घेतलेली एकमेव स्री म्हणून त्यांची ओळख आहे. मास्टर ऑफ अँडमिनिस्ट्रेटिव्ह ही पदवी घेतल्यानंतर वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी त्या राजकारणात आल्या

सना यांचा पंतप्रधान पदापर्यंतचा प्रवास सहज सोपा नव्हताच, आपल्या आयुष्यात त्यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागलं आहे

सना या लहान असतानाच त्यांचे आईवडील परस्परांमधल्या वादामुळे वेगळे राहू लागले होते. पुढे त्यांचा सांभाळ त्यांच्या आईनं आणि तिच्या आईच्या आयुष्याची जोडीदार झालेल्या एका तिच्या मैत्रिणीनं केला. सना आपल्या या कुटुंबाचा उल्लेख इंद्रधनुष्य असा करते

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांच्याप्रमाणे सना मरीन यांनी सुद्धा बाळाला जन्म दिला आहे. २०१८ मध्ये त्यांनी एका सुंदर कन्यारत्नलाा जन्म दिला.

सना मरीन २००६ साली सोशल डेमोक्रॅटिक पक्षामध्ये सहभागी झाल्या. २०१० ते २०१२ दरम्यान त्या पक्षाच्या उपाध्यक्ष होत्या.

सना मरीन २०१५ पासून खासदार आहेत. त्या पक्षाच्या उपप्रमुख आहेत. मागच्या सरकारमध्ये त्या वाहतूक मंत्री होत्या.

लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी अजून भरपूर काम करावे लागणार आहे असे सना मरीन यांनी त्यांच्या वयासंबंधी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर दिले

आज त्यांना जगातल्या सर्वात तरुण पंतप्रधान होण्याचा मान मिळाला असला तरी सना म्हणतात, ‘मी आज माझ्या स्री असण्याचा, तरुण असण्याचा विचार करत नाही. माझ्या लेखी त्याला महत्त्व नाही. मला मुद्दे महत्त्वाचे वाटतात. ते मुद्दे जे आम्ही निवडणुकांदरम्यान मांडले होते. तेच मुद्दे ज्यावर लोकांनी विश्वास ठेवून आम्हाला मतं दिली, आम्हाला निवडून दिलं त्या मुद्दय़ांना धरून काम करणं माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे !’

सना मरीन यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकारमध्ये 12 महिला आणि सात पुरुष मंत्री आहेत. अर्थमंत्री, शिक्षण मंत्री, न्याय मंत्री अशी महत्त्वाची पदं महिलांकडे आहेत. फिनलंडमधील सना यांच्या नेतृत्वाखाली एक नवं युग सुरू झालं आहे. .या तरुण महत्त्वाकांक्षी स्रीकडे आता जगाचं लक्ष असेल !