Shocking : ऑलिम्पिकपटूचा समुद्रात बुडून मृत्यू; मालकाच्या प्रतिक्षेत कुत्रा किनाऱ्यावर बसून!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 03:53 PM2020-07-10T15:53:02+5:302020-07-10T15:57:04+5:30

हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करणारा अॅलेक्स पुल्लीन याचा 32व्या वर्षी समुद्रात बुडून मृत्यू झाला. कुटुंबातील काही सदस्यांच्या डोळ्यादेखत तो समुद्रात नाहीसा झाला.

चम्पी या टोपणनावानं पुल्लीन ओळखला जायचा. त्यानं 2011ला ला मोलिना येथे झालेल्या क्रॉस इव्हेंटमध्ये आणि 2013मध्ये स्टोनहॅम येथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.

2014च्या सोची हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेत तो ऑस्ट्रेलियन संघाचा ध्वजधारक होता. ऑस्ट्रेलियन विंटर क्रीडा संघटनेनं शोक व्यक्त केला आहे.

स्नोबोर्ड या खेळातील दिग्गज खेळाडू पुल्लीन यानं दोन वेळा विश्वविजेतेपद पटकावलं आहे. गोल्ड कोस्ट येथील पाल्म बिच येथे त्याचा मृत्यू झाला.

मारेमारी करण्यासाठी तो समुद्रात उतरला होता आणि तेथे त्याचं ऑक्सिजन संपल्यामुळे तो बेशुद्ध झाला. सोबत असलेल्या मासेमारांनी त्याचे शव किनाऱ्यावर आणले.

त्याच्या निधनानंतर शोक व्यक्त करण्यासाठी कुटुंबीय त्या समुद्र किनाऱ्यावर जमले होते.

त्यात त्याचा पाळीव कुत्रा रुम्मी याचाही समावेश होता आणि आपल्या मालकाच्या प्रतीक्षेत तो आजही तेथेच बसून आहे.

सोशल मीडियावर त्या कुत्र्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर क्रीडा विश्व पुन्हा भावूक झाले आहे.

पुल्लीन याची गर्लफ्रेंड एलिडी व्लूग हिनं हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला.