धक्कादायक; सहाव्या माळ्यावरून खाली पडून 20 वर्षीय ऑलिम्पिकपटूचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 10:28 AM2020-07-20T10:28:11+5:302020-07-20T10:30:56+5:30

एकाटेरिना अॅलेस्झांड्रोवक्साया हिचे रविवारी निधन झाले. 20 वर्षीय एकाटेरिनानं 2018च्या ऑलिम्पिक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले होते.

ऑलिम्पिकपटूचे निधन होण्याची ही मागील 12 दिवसांतील दुसरी घटना आहे. 8 जुलैला दोन वेळचा विश्वविजेता स्नोबोर्डर अॅलेक्स पुलिनचा समुद्रात बुडून मृत्यू झाला होता.

एकाटेरिना हिचा जन्म रूसचा, परंतु 2016मध्ये तिनं ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व मिळवले आणि त्यांच्याकडून तिनं स्केटिंग स्पर्धेत प्रतिनिधित्व केलं.

2018च्या पेयांगचांग ऑलिम्पिक स्पर्धेत तिनं सहकारी हार्ले विंडरससह सहभाग घेतला होता.

अनेक दुखापतींमुळे तिनं फेब्रुवारी महिन्यात निवृत्ती घेतली होती.

एका वृत्तानुसार मॉस्को येथील घरातील खिडकीतून पडून तिचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे.

एकाटेरिनाचे प्रशिक्षक आंद्रेई खेकालो यांनी सांगितले की,''मॉस्को येथे सहाव्या माळ्यावरून ती खिडकीतून खाली पडली.''

रशियन मीडियाच्या वृत्तानुसार एकाटिरेननं आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. तिनं एक नोट लिहिली आणि त्यात I LOVE असे नमूद केले होते.