आम्ही आंदोलक शेतकऱ्यांसोबत, ट्रॅक्टरमधून लग्नमंडपात पोहोचले वधू-वर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 03:51 PM2021-02-02T15:51:09+5:302021-02-02T16:14:05+5:30

शिवसेनेचे खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत यांच्यासह शिवसेनेच्या शिष्टमंडळानं आज भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी दिल्ली उत्तर प्रदेशच्या सीमेवर असलेल्या गाझीपूर येथे भेट घेतली.

आम्ही राकेश टिकैत यांच्याशी चर्चा केली आहे. आमचं शिवसेनेचे सर्व खासदार या ठिकाणी आले. त्यांना जो संदेश द्यायचा होता तो आम्ही दिला आहे. आम्ही पूर्ण ताकदीनीशी शेतकऱ्यांसोबत उभे आहोत.

सरकारनं त्यांच्याशी योग्यरित्या चर्चा केली पाहिजे. हा कोणत्याही राज्याचा विषय नाही. हा देशातील शेतकऱ्यांचा विषय आहे. चर्चेत कोणतंही राजकारण येऊ देऊ नये," असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेलं शेतकरी आंदोलन थांबविण्याचं आवाहन केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केलं आहे.

शेतकऱ्यांना आता कोणत्याही आंदोलनाची गरज नाही. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत आणि प्रत्येक गोष्टी ऐकून घेण्याचीही तयारी दाखवली आहे. पण शेतकरी संघटनांच्या नेत्यांच्या हट्टापायी कोणताही तोडगा निघू शकत नाहीय, असं तोमर म्हणाले.

उत्तराखंडच्या एका शेतकरी जोडप्याने हटकेस्टाईल शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. सीवलजितसिंग आणि संदीप कौर यांनी सर्वसाधारणपे लग्नसोहळा उरकून आपली लग्नगाठ बांधली. उत्तराखंडच्या बझपूर येथील गुरुद्वारा येथे हा विवाहसोहळा संपन्न झाला.

या लग्नसोहळ्याला उपस्थित असलेल्या पाहुण्यांनी लग्नसोहळ्याचं कौतुक केलं. कारण, दिल्ली बॉर्डरवरील शेतकरी आंदोलकांना नवरा-नवरीसह कुटुंबीयांनी समर्थन दिलं होतं. लग्नसोहळ्यात शेतकऱ्यांना मसर्थन देणारी गाणी वाजवली जात होती, तर उपस्थित पाहुणेमंडळींनीही सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केलीय.

नवविवाहीत जोडपे लग्नमंडपात कारऐवजी ट्रॅक्टरमधून पोहोचले, हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. पण, शेतकरी आंदोलनाचे समर्थन देत असल्याचे समजताच सर्वांनी कौतुकही केले.

आम्ही थाटामाटात हे लग्न करत नसून सर्वसाधारपणे लग्न करत आहोत. या वाचलेल्या पैशातून गुरुद्वारा येथे लंगरसाठी मदत देण्याचं काम आम्ही करणार आहोत, असे मुलीचे वडिल असलेल्या तरसेम सिंग यांनी सांगितले.

गेल्या आठवड्यात मी शेतकरी आंदोलनात सीमेवर सहभागी होतो, तेथील आंदोलकांनी धडपड आणि अवस्था पाहून आपण दु:खी असल्याचे सवलजीत सिंगने म्हटलं. हजारो शेतकरी दिल्लीच्या विविध सीमा भागांवर गेल्या 2 महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. अद्यापही शेतकऱ्यांचं हे आंदोलन सुरुच आहे.

मी माझ्या डोक्यातील संकल्पना माझ्या पत्नीला सांगितली, तिलाही ती मान्य झाली. आम्ही दोघेही शेतकरी कुटुंबातील आहोत, त्यामुळेच शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शविण्याचा निर्णय घेतल्याचे सीवलजीत सिंगने टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले.