बेवफा चायवाला... गर्लफ्रेंड सोडून गेलेल्यास १० रू अन् जोडप्याला १५ रुपयांत चहा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 07:15 PM2023-02-06T19:15:58+5:302023-02-06T19:34:59+5:30

बिहारच्या बेतियातील मनुआपुल येथे एक चहावाला सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. बेवफा चायवाला २ असं या चहावाल्याच्या कँटीनंचं नाव आहे.

बिहारच्या बेतियातील मनुआपुल येथे एक चहावाला सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. बेवफा चायवाला २ असं या चहावाल्याच्या कँटीनंचं नाव आहे.

या चहाच्या ठेल्यावर प्रेमी युगुलांसाठी १५ रुपयांना चहा मिळतो, तर ज्यांना गर्लफ्रेंड सोडून गेलीय, त्या युवकांना १० रुपयांत चहा विकला जातो.

कुमार कार्तिक असं या चहवाल्या युवकाचं नाव असून तो गरीब घरातून आलेला आहे. त्यास, हालाकीच्या परिस्थितीमुळेच केवळ ८ वी पर्यंतच शिक्षण करता आलं.

लहानपणापासूनच गायक व्हायचं त्याचं स्वप्न होतं, पण गाणं रेकॉर्ड करुन ते रिलीज करण्यासाठीचे पैसे नसल्याने ती आवड केवळ आवडच राहिली.

सन २०१६ साली मजुरी करत त्याने काही पैसे कमावले अन् त्यातूनच गाण्याची आवड जोपासत गेला. दरम्यान, याच काळात एका मुलीशी ओळख झाली, तो तिच्या प्रेमात पडला.

ती मुलगीही गायिका होऊ इच्छित होती, त्यामुळे कार्तिकने आपल्या पैशाने तिचे गाणे रेकॉर्ड केले. एक महिन्यापूर्वी त्या गायिकाचं गाणं हिट झालं.

प्रेयसीचं गाणं हिट झाल्यानंतर ती कार्तिकला सोडून गेली. तिने कार्तिकची फसवणूक केली. तर, नंबरही ब्लॉक लिस्टमध्ये टाकला.

विशेष म्हणजे कार्तिकने कर्ज काढून गर्लफ्रेंडला आयफोन घेऊन दिला होता. तरीही प्रेयसी बेवफा झाली, ती कार्तिकला सोडून निघून गेल्याने कार्तिकला मोठं दु:ख झालं.

प्रेयसीच्या विरहातून सावरल्यानंतर कार्तिकने बेवफा चायवाला २ नावाने चहाचा स्टॉल सुरू केला. त्यावर, बेवफा शायरीही लिहिली. तर, बेवफा लोकांना ५ रुपये कमी किंमतीत चहा ठेवला. त्यामुळे हा चहावाला चांगलाच चर्चेत आला आहे