मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 13:29 IST2025-08-09T13:24:08+5:302025-08-09T13:29:37+5:30

Middle Class News: महिन्याचा पगार येताच घर, कार, दुचाकी आदींचा इएमआय, विविध सब्स्क्रिप्शन यांच्यावर खर्च होतो. अशाच काही गोष्टींमुळे मध्यमवर्गीयांची आर्थिक परिस्थिती बिघडून ते गरिबीच्या खाईत लोटले जातात. मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटणाऱ्या पाच गोष्टींबाबत आज आपण जाणून घेऊयात.

मध्यमवर्ग हा देशातील अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. या वर्गाच्या मेहनतीवर आणि त्याच्या क्रयशक्तीवर अनेक आर्थिक उलाढाली अवलंबून असतात. मात्र आर्थिकदृष्टा हाच वर्ग सर्वाधिक ओढाताण सहन करत असतो. ठरावीक काळाने पगार वाढत असला तरी महिनाअखेरीस या वर्गातील पगारदार मंडळींचा खिसा रिकामा होतो.

महिन्याचा पगार येताच घर, कार, दुचाकी आदींचा इएमआय, विविध सब्स्क्रिप्शन यांच्यावर खर्च होतो. अशाच काही गोष्टींमुळे मध्यमवर्गीयांची आर्थिक परिस्थिती बिघडून ते गरिबीच्या खाईत लोटले जातात. मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटणाऱ्या पाच गोष्टींबाबत आज आपण जाणून घेऊयात.

हल्ली महागडे स्मार्टफोन बाळगणे हा प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. मात्र ८० ते ९० हजार रुपयांचा स्मार्टफोन ईएमआयवर खरेदी केल्याने खिशावर दीर्घकालीन परिणाम होतो. तसेच अशा ईएमआयमुळे बचत आणि गुंतवणूक करणे शक्य होत नाही.

सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर परदेश दौऱ्याचे फोटो टाकणे हे स्टेटस सिंम्बॉल बनले आहे. मात्र क्रेडिट कार्डवर केलेला महागडा परदेश दौरा डोक्यावर कर्जाचं ओझं वाढवतो. अनेकदा या कर्जाचे व्याजदर अवाक्याबाहेर जातात, त्यामुळे आर्थिक स्वास्थ्य बिघडते.

कॅफेमध्ये बसून महागडी कॉफी पिणं, ऑनलाईन जेवण ऑर्डर करणं सुरुवातीला कमी खर्चिक वाटतं. मात्र नियमितपणे होणारा असा खर्च महिन्याच्या शेवटी खूप महागात पडतो.

सध्या नेटफ्लिक्स, प्राइम, हॉटस्टार अशा ओटीटी प्लॅटफॉर्मवरील विविध अॅप्सचं सब्स्क्रिप्शन घेण्यासाठी खूप पैसे मोजले जातात, मात्र बहुतांश वेळा अशा सब्स्क्रिप्शनचा पुरेसा वापरही होत नाही. तरीही अशा सब्स्क्रिप्शनवर वर्षाकाठी हजारो रुपये खर्च होतात.

आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांमध्ये आणि नातेवाईकांमध्ये स्टेटस मिरवण्यासाठी महागडी कार, बाईक खरेदी करणं ही मध्यमवर्गीयांकडून होणारी सर्वसामान्य चूक आहे. अशआ वाहनांच्या ईएमआयसोबत विमा, मेन्टेनन्स आणि इंधनावर खर्च जोडून मोठी रक्कम खर्च होते. तसेच त्यामुळे महिन्याच्या कमाईवरील ओझं वाढतं.