दिवसा काम अन् रात्री अभ्यास; स्वप्न सत्यात उतरवून 'तो' झाला IAS, संपूर्ण गावाला वाटतो अभिमान
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 17:10 IST2025-11-23T17:04:30+5:302025-11-23T17:10:54+5:30
IAS Mayank Tripathi : दिवसा काम आणि रात्री अभ्यास करून परीक्षेची तयारी करणं सोपं नव्हतं.

कठोर परिश्रम करून मयंक त्रिपाठीने आपलं स्वप्न साकार केलं आहे. मयंकने यूपीएससीमध्ये १० वा रँक मिळवला आणि तो आयएएस अधिकारी बनला आहे. त्याच्यापासून आता अनेकांना प्रेरणा मिळत आहे.

दिवसा काम आणि रात्री अभ्यास करून परीक्षेची तयारी करणं सोपं नव्हतं. पण मयंकचं स्वप्न आयएएस अधिकारी होण्याचं होतं. त्याने दोनदा यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. अखेर त्याला मेहनतीचं फळ मिळालं.

मयंक त्रिपाठी हा उत्तर प्रदेशातील कानपूरचा आहे. प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो दिल्लीच्या प्रसिद्ध हिंदू कॉलेजमध्ये गेला, जिथे त्याने इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतं. त्याला सिव्हिल सेवेत सामील व्हायचं होतं.

मयंकने २०२२ मध्ये उत्तर प्रदेश लोकसेवा आयोग (यूपीपीसीएस) परीक्षा उत्तीर्ण केली आणि डीएसपीची पोस्टिंग मिळवली. पण त्याला आयएएस अधिकारी व्हायचं होतं आणि म्हणूनच त्याने यूपीएससीची तयारी केली.

मयंकने रात्री अभ्यास केला. दिवसा तो खूप कष्ट करत होता. त्याच्या घवघवीत यशाने त्याच्या कुटुंबाला,गावाला, राज्याला आणि देशाला अभिमान वाटला. योग्य दिशा आणि कठोर परिश्रमाने कोणतेही स्वप्न पूर्ण करता येते हे त्याने सिद्ध करून दाखवलं.

मयंकने २०२३ मध्ये यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि ३७३ रँकसह भारतीय महसूल सेवेत (आयआरएस) रुजू झाला. २०२४ मध्ये मयंक त्रिपाठीने यूपीएससी सीएसईमध्ये ऑल इंडिया १० वा रँक मिळवला.

मयंक नीट तयारी करत होता. त्याने प्रथम वेळापत्रक तयार केलं आणि त्याचं पालन केलं. त्याने एनसीईआरटीच्या पुस्तकांमधून मजबूत पाया करून अभ्यास केला. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी त्याने चालू घडामोडींवरही लक्ष केंद्रित केलं.

मयंक कुमार अग्रवालची यशोगाथा लाखो तरुणांना प्रेरणादायी आहे. तो आधी डीएसपी होता, परंतु त्याचं स्वप्न आयएएस अधिकारी होण्याचं होतं. त्याने दिवसा काम करून आणि रात्री अभ्यास करून हे ध्येय साध्य केलं.

















