...तर तुम्हाला मिळणार नाही पीएम किसान सन्मान योजनेचा नववा हप्ता, जाणून घ्या नियमात झालेला हा बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 06:30 PM2021-07-13T18:30:11+5:302021-07-13T18:34:09+5:30

PM Kisan Samman Nidhi 9th Installment: पंतप्रधान किसान सन्मान निधीअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षातून तीन वेळा प्रत्येकी दोन हजार रुपये दिला जातात. या योजचा नववा हप्ता लवकरच जमा होणार आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधीअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षातून तीन वेळा प्रत्येकी दोन हजार रुपये दिला जातात. या योजचा नववा हप्ता लवकरच जमा होणार आहे. दरम्यान, योजनेचा लाभ घेण्यासाठीच्या नियमांमध्ये वारंवार बदल करण्यात येत असतात. या बदलांमधून ही योजना शेतकऱ्यांसाठी अधिक सोयीस्कर करण्याचा सरकारचा प्रयत्न असतो. आता आपण जाणून घेऊयात या योजनेत झालेल्या नव्या बदलांविषयी.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत आता शेतकऱ्यांना नोंदणीसाठी कुठल्याही सरकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागणार नाहीत. सरकारने या योजनेशी संबंधित पोर्टलवरच नोंदणीचा पर्याय दिला आहे. म्हणजेच आथा शेतकऱ्यांना विविध सरकारी कार्यालयात धाव घ्यावी लागणार नाही.

जर तुमच्याकडे खाते, आधारकार्ड, मोबाईल क्रमांक आणि बँक अकाऊंट नंबर याबाबतची माहिती असेल तर तुम्ही स्वत: https://pmkisan.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन फॉर्म्स कॉर्नरच्या पहिल्या पर्यायावर क्लिक करून नोंदणी करू शकता.

यापूर्वी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी ज्या शेतकऱ्यांची शेतजमीन दोन हेक्टरपेक्षा कमी आहे, असेच शेतकरी अर्ज करू शकत होते. मात्र आता केंद्र सरकारने याबाबतच्या नियमामध्ये मोठा बदल करून जुना नियम रद्दबातल केला आहे. त्यामुळे आता अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेणे शक्य होणार आहे.

दरम्यान, या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे जे शेतकरी आपले आधार कार्ड या योजनेशी जोडून घेतील त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. आता तुम्ही या आधारकार्डची माहिती, चुकांची दुरुस्ती किंवा बदल या योजनेच्या संकेतस्थळावर जाऊन करू शकता.

या योजनेंतर्गत आता शेतकरी स्वत: आपला स्टेटस चेक करू शकतात. योजनेच्या वेबसाईटवर स्टेटस चेक करण्याचा पर्याय देण्यात आलाआहे. अशा परिस्थितीत शेतकरी त्याच्या मदतीने आपले खाते आणि योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या हप्त्याची माहिती पाहू शकतात. त्यासाठी त्यांना अधिकृत संकेतस्थळावर आधार नंबर आणि मोबाईल किंवा बँक अकाऊंट नंबर नोंद करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे स्टेटस मिळेल.

केंद्र सरकारने आता पीएम किसान सन्मान निधी योजनेला किसान क्रेडिट कार्ड योजनेशी जोडले आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेणारे शेतकरी सहजपणे किसान क्रेडिट कार्ड बनवू शकतात. तसेच या माध्यमातून मिळणाऱ्या कर्जाच्या हप्त्याचा लाभही घेऊ शकतात.

पीएम-किसान सन्मान निधीच्या लाभार्थ्यांसाठी अजून एक खूशखबर आहे. ती म्हणजे आता त्यांना पीएम किसान मानधन योजनेसाठी कुठल्याही प्रकारचे कागद द्यावे लागणार नाहीत. म्हणजेच आता पीएम किसान सन्मान निधी योजनेमधून लाभ घेत असलेले शेतकरी आपल्या मानधन योजनेच्या खात्यासाठी किसान सन्मान निधीमधूनही पैसे देऊ शकतात.