अभिमानास्पद गगनभरारी... राष्ट्रपती अन् संरक्षणमंत्र्यांकडून भारतीय वायू दलाचे अभिनंदन

By महेश गलांडे | Published: October 8, 2020 09:50 AM2020-10-08T09:50:20+5:302020-10-08T10:06:13+5:30

भारतीय हवाई दलाचा आज 88वा स्थापना दिवस साजरा होत आहे. यानिमित्ताने गाझियाबादमधील हिंडन एअरबेसवर हवाई दलाची ताकद पाहायला मिळणार आहे.

येथील आयोजित कार्यक्रमात यंदा एकूण 56 विमानांचा सहभाग आहे. यामध्ये राफेल, सुखोई, मिग29, मिराज, जॅग्वार, तेजस विमानांचा समावेश आहे.

यावेळी हिंडन एअरबेसवर थरारक प्रात्यक्षिके पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे राफेल लढाऊ विमान हे यंदाचे खास आकर्षण आहे.

भारती हवाई दलाच्या वर्धापन दिनानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरच्या माध्यामातून हवाई दलाच्या जवानांचे अभिनंदन केले आहे. "हवाई दलाच्या दिनानिमित्त भारतीय हवाई दलाच्या सर्व शूर योद्ध्यांना शुभेच्छा!

आपण फक्त देशाचे अवकाश सुरक्षित ठेवत नाही तर आपत्तीच्यावेळी मानवतेच्या सेवेतही अग्रेसर भूमिका बजावत असता. भारत मातेच्या रक्षणासाठी आपले धैर्य, पराक्रम आणि समर्पण सर्वांनाच प्रेरणा देणार आहे", असे ट्विट नरेंद्र मोदींनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती वैंकय्या नायडूंनीही हवाई दलाला शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय हवाई दलाचा अभिमान असल्याचं वैंकय्या नायडूंनी म्हटलंय.

देशभरातील नागरिकांकडून वायू दलाचे अभिनंदन करण्यात येत आहे, तसेच अभिमानास्पद कामगिरीचे कौतुकही करण्यात येत आहे

भारतीय वायू दलाने आजपर्यंत देशाच्या संरक्षणात आणि शत्रूराष्ट्रावर जरब ठेवण्यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे.

वायू दलाच्या अधिकाऱ्यांकडून आज 88 व्या स्थापना दिवसानिमित्त विविध कसरतींद्वारे वायू दलाच्या सामर्थ्याचे प्रदर्शन करण्यात येत आहे

भारतीय सैन्य दलाकडूनही वायू दलाचे अभिनंदन करण्यात आले आहे. तसेच, ट्विटरवर फोटो शेअर करत भारतीय वायू दलाचा गौरवही करण्यात आला.

नुकतेच भारतीय वायू दलात राफेल विमानाचे आगमन झाल्याने, भारताचे सामर्थ्य वाढले आहे. 5 राफेल विमानांनी वायू दलाची शान वाढवली आहे.