UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 14:55 IST2025-12-26T14:05:45+5:302025-12-26T14:55:55+5:30
IPS Officer Poorva Chaudhary Story: पूर्वाने एकूण ९३६ गुणांसह UPSC उत्तीर्ण करत ५३३वा क्रमांक मिळवला.

IPS Officer Poorva Chaudhary Story:
यूपीएससी नागरी सेवा परीक्षा ही देशातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठित परीक्षांपैकी एक मानली जाते. या परीक्षेत यशस्वी होणे हे लाखो तरुणांचे स्वप्न असते. राजस्थानची पूर्वा चौधरी हिने २०२४च्या यूपीएससी परीक्षेत ५३३वा क्रमांक मिळवून अप्रतिम कामगिरी केली.

पूर्वा चौधरी हिने ओबीसी श्रेणी अंतर्गत यूपीएससी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली. तिने लेखी परीक्षेत ७७१ गुण मिळवले आणि मुलाखतीत (पर्सनल इंटरव्ह्यू) १६५ गुण मिळवले. तिने एकूण ९३६ गुणांसह ही कठीण परीक्षा उत्तीर्ण केली. तिने ५३३वा क्रमांक मिळवला.

पूर्वा चौधरी हिने ओबीसी श्रेणी अंतर्गत यूपीएससी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली. तिने लेखी परीक्षेत ७७१ गुण मिळवले आणि मुलाखतीत (पर्सनल इंटरव्ह्यू) १६५ गुण मिळवले. तिने एकूण ९३६ गुणांसह ही कठीण परीक्षा उत्तीर्ण केली. तिने ५३३वा क्रमांक मिळवला.

पूर्वाच्या कामगिरीने परिसरात आनंद पसरला आहे. पण पूर्वा मात्र सोशल मीडियावर शेअर होणाऱ्या तिच्या फोटोंमुळे आणि एका वादामुळेच चर्चेत आली आहे. तिच्या OBC-NCL (नॉन क्रिमीलेयर) प्रमाणपत्राबाबत वाद निर्माण झाल्याने तिचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे.

काही लोकांनी तिच्या वडिलांच्या RAS अधिकारी म्हणून असलेल्या दर्जाबद्दल आणि तिच्या कथित आर्थिक स्थितीबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत, ज्यामुळे पूर्वा चौधरीच्या यशाबाबद साशंकता आणि वाद निर्माण झाल्याचे दिसते आहे. जाणून घ्या, संपूर्ण कहाणी...

पूर्वा चौधरीच्या ओबीसी नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्राबद्दल वाद सुरू झाला आहे. काही नेटकऱ्यांनी असा दावा केला आहे की पूर्वाचे वडील ओमप्रकाश सहारन हे राजस्थान प्रशासकीय सेवेत (RAS) वरिष्ठ अधिकारी असताना तिला NCL श्रेणीचे फायदे मिळू नयेत.

वाद एवढ्यावरच थांबला नाही. काही लोकांनी पूर्वाच्या फोटोंमध्ये दिसणाऱ्या महागड्या हँडबॅग्ज आणि कारचा हवाला देत तिच्या आर्थिक परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तिच्या फोटोंमध्ये ती परदेशातही आलिशान ठिकाणी दौरे करत असतानाही दिसली.

प्रभावशाली कुटुंबातील मुले आरक्षणाचा गैरवापर करत आहेत आणि गरजूंना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवत आहेत, असा आरोप सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर करण्यात आला. या दाव्यांमुळे इंटरनेटवर मोठा वाद निर्माण झाला.

राजस्थान प्रशासकीय सेवेत अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल पूर्वाचे वडील ओमप्रकाश सहारन हे सध्या कोटपुतली येथे पोस्टेड आहेत. पूर्वाचे यश हे तिच्या वर्षानुवर्षे केलेल्या कठोर परिश्रम, शिस्त आणि समर्पणातून मिळवलेले आहे, असे ते म्हणतात.

पण सोशल मीडियावर वाद निर्माण झाल्यामुळे कुटुंबाला भूमिका स्पष्ट करावी लागली. तिचे वडील म्हणाले की, इंटरनेटवर पसरवले जाणारे आरोप नियमांबद्दल अपूर्ण माहितीवर आधारित आहेत. या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. गोष्टी पूर्णपणे निराधार आहेत.

ओमप्रकाश सहारन यांच्या मते, OBC-NCL नियम स्पष्ट आहे. जर एखादी व्यक्ती ४० वर्षांच्या आधी थेट भरतीद्वारे वर्ग-१ किंवा गट-अ सेवेत सामील झाली, तर त्यांच्या कुटुंबाला ओबीसी-एनसीएलचे फायदे मिळत नाहीत आणि ते ४४ व्या वर्षी IAS अधिकारी झाले.

त्यामुळे पूर्वाची नियुक्ती पूर्णपणे नियमांमध्ये येते असे त्यांचे मत आहेत. तसेच, सोशल मीडियावर जाणीवपूर्वक तिला ट्रोल केले जात आहे आणि चुकीची माहिती दिली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

या संपूर्ण वादामुळे पुन्हा एकदा यूपीएससीच्या निवड प्रक्रिया आणि आरक्षण प्रणालीबद्दल राष्ट्रीय चर्चेला उधाण आले आहे. अलिकडच्या काळात, ओबीसी, ईडब्ल्यूएस आणि पीडब्ल्यूबीडी कोटाच्या गैरवापराबद्दल असंख्य प्रकरणे समोर आली आहेत.
















