CoronaVirus News : आशेचा किरण! कोरोनाच्या संकटात प्लाझ्मा थेरपी देतेय शुभ संकेत; रिसर्चमधून खुलासा

By सायली शिर्के | Published: October 27, 2020 11:16 AM2020-10-27T11:16:35+5:302020-10-27T11:38:38+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीचा सकारात्मक परिणाम दिसून आला . तसेच यामुळे कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचा दर कमी झाला असल्याचं देखील म्हटलं होतं. मात्र आता प्लाझ्मा थेरपीबाबत महत्त्वाची माहिती मिळत आहे.

देशात गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाचा वेग हा थोडा मंदावताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 36,469 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 488 जणांचा मृत्यू झाला आहे.

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 79,46,429 वर पोहोचला आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,19,502 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

भारतात काही ठिकाणी कोरोनाग्रस्तांवर प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार सुरू केले आहेत. प्रभावी औषध किंवा लस नसतानाही प्लाझ्मा थेरपी कोरोनाच्या उपचारात मोठ्या प्रमाणात प्रभावी असल्याचे सिद्ध होत असल्याची माहिती समोर आली होती.

कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीचा सकारात्मक परिणाम दिसून आला . तसेच यामुळे कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचा दर कमी झाला असल्याचं देखील म्हटलं होतं. मात्र आता प्लाझ्मा थेरपीबाबत महत्त्वाची माहिती मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी प्लाझ्मा थेरपीमुळे कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झालेलं नाही असं गुलेरिया यांनी म्हटलं होतं. आयसीएमआरने केलेल्या सूक्ष्म निरिक्षणानंतर डॉ. गुलेरिया यांनी माहिती दिली होती.

प्लाझ्मा थेरपीबाबत आता पुन्हा एकदा चांगले संकेत मिळत आहेत. देशातील काही कोरोना रुग्णांना त्याचा फायदा झाल्याची माहिती संशोधनातून मिळत आहे.

इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि तमिळनाडूतील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ एपिडेमिऑलॉजीच्या संशोधकांनी मिळून एप्रिल ते जुलै या काळात देशातील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांचा अभ्यास केला.

ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये (BMJ) हा रिसर्च प्रकाशित झाला आहे. 18 वर्षांहून अधिक वय असलेल्या आणि कोरोनाची सामान्य लक्षणं असणाऱ्या 464 रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीचा अभ्यास केला.

प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून ठिक झालेल्या व्यक्तींच्या रक्तातून प्लाझ्मा घेऊन कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यात येतात. प्लाझ्मा थेरपी फायदेशीर असल्याचं म्हटलं जात असल्याने प्लाझ्मा दान करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

संशोधनात 239 रुग्णांना 24 तासांच्या अंतराने दोनदा प्लाझ्मा देण्यात आला आणि इतर सामान्य उपचार केले गेले. तसेच 229 जणांवर फक्त सामान्य उपचार करण्यात आले.

एका महिन्याने ज्यांना प्लाझ्मा दिला होता त्यापैकी 44 रुग्णांचा आजार गंभीर झाला आणि काही कारणांनी त्यांचा मृत्यू झाला. मात्र अनेकांना त्याचा फायदा झाल्याची माहिती संशोधकांनी दिली आहे.

SARS-CoV-2 RNA ची लागण झालेल्या रुग्णाला धाप लागणं, डोकेदुखी यासारखी लक्षणं दिसत असतील तर त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर 7 दिवसांपर्यंत प्लाझ्मा थेरपी दिल्यास ही लक्षणं कमी होऊ शकतात.

प्लाझ्मा थेरपीचा हा मर्यादित उपयोग असल्याचं नव्या छोट्या चाचणीमधून स्पष्ट झाल्याचं रिसर्चमध्ये म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोनावर मात केलेल्या अनेक रुग्णांनी प्लाझ्मा दान केले आहे. प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून पूर्णपणे ठिक झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील 800 मिली रक्त घेतलं जातं.

रक्ताचा वापर करून अँटीबॉडीजयुक्त प्लाझ्मा वेगळे केले जातात. यानंतर प्लाझ्मा कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या शरीरात इंजेक्ट केला जातो. प्लाझ्मा थेरपी अनेक रुग्णांसाठी उपयुक्त ठरली आहे.

जेव्हा शरीर कोणत्याही बॅक्टेरीयाच्या संपर्कात येते तेव्हा रोगप्रतिकारक यंत्रणा स्वयंचलितपणे सक्रिय होते आणि अँटीबॉडीज रिलीज होतात. कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बरे झालेल्या रूग्णांमध्ये प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज असतात जे आधी कोरोनाशी लढलेले असतात.