Corona Virus : चिंताजनक! भारतात सापडले कोरोनाचे सर्व व्हेरिएंट; 'अशी' साजरी करा दिवाळी, डॉक्टरांचा गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2022 05:10 PM2022-10-24T17:10:48+5:302022-10-24T17:25:08+5:30

Corona Virus : देशात सध्या कोरोनाच्या BQ.1, XBB व्यतिरिक्त, Omicron च्या BF.7 आणि BA.5.1.7 व्हेरिएंटची प्रकरणे देखील नोंदवली गेली आहेत.

भारतात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत थोडी घट झाली असली तरी जगभरात कोरोनाने टेन्शन वाढवलं आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत असतानाच नवनवीन व्हेरिएंट देखील सापडत आहेत. यामुळेच नव्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशात सध्या कोरोनाच्या BQ.1, XBB व्यतिरिक्त, Omicron च्या BF.7 आणि BA.5.1.7 व्हेरिएंटची प्रकरणे देखील नोंदवली गेली आहेत. सणासुदीचे दिवस सुरू असल्याने सर्वत्र गर्दी पाहायला मिळत आहे.

नॅशनल टेक्निकल एडवाइजरी ग्रुप ऑन इम्यूनाइजेशन (NTAGI) चे चेअरमन आणि कोविड टास्क फोर्सचे माजी प्रमुख डॉ नरेंद्र कुमार अरोरा यांनी कोरोनाच्या काळात देशवासियांना इशारा दिला आहे. कोरोनाचे सर्व व्हेरिएंट भारतात आहेत. असा कोणताही व्हेरिएंट नाही जो इतर कोणत्याही देशात आहे आणि येथे नाही.

सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपल्या देशात इतर ठिकाणी असलेला गोंधळ आणि भीती दिसत नाही. डॉ. अरोरा म्हणतात की, भारतात खूप चांगले लसीकरण झाले आहे. येथील बहुतांश लोकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. त्याच वेळी आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त, फ्रंटलाइन कामगार आणि सामान्य लोकांना देखील बूस्टर डोस मिळाला आहे.

कोरोना संकटात लसीकरण झालेले असले तरी काळजी घेण्याची गरज आहे. जीनोम सिक्वेन्सिंगद्वारे नवीन व्हेरिएंट शोधण्याव्यतिरिक्त, त्यांच्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. मात्र, नवीन व्हेरिएंट किती धोकादायक आहेत याबाबत काहीही सांगता येणार नाही. अंदाजानुसार, ते ओमायक्रॉनच्या आधी आलेल्या इतर व्हेरिएंटप्रमाणे कमी प्राणघातक असू शकतात.

कोरोना संसर्ग कमी असेल तरी नागरिकांनी उत्सव साजरा करताना काळजी घेण्याची गरज आहे. दिवसेंदिवस नवीन व्हेरिएंट येत आहेत. मात्र, घाबरण्याची किंवा अस्वस्थ होण्याची अजिबात गरज नाही. दिवाळीचा सण खूप प्रेमाने साजरा करा पण काही योग्य ती खबरदारी नक्की घ्या.

जर तुम्ही बाहेर गेलात तर मास्क आवश्य घाला. लोकांना भेटा पण सॅनिटायझर किंवा साबणाने हात धुण्याचं विसरू नका, असं आवाहन डॉ नरेंद्र कुमार अरोरा यांनी केलं आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

ओमायक्रॉनच्या नव्या व्हेरिएंटची भारतात एन्ट्री झाली आहे. आतापर्यंत, Omicron च्या नवीन XBB सब-व्हेरिएंटची 71 हून अधिक प्रकरणे भारतात नोंदवली गेली आहेत. महाराष्ट्राने XBB सब व्हेरिएंटच्या 5 प्रकरणांची पुष्टी केली. यापूर्वी, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि तामिळनाडूमध्ये या सब व्हेरिएंटची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत.

गेल्या 15 दिवसांच्या कालावधीत, ओडिशात 33, बंगालमध्ये 17 आणि तामिळनाडूमध्ये 16 प्रकरणे नोंदवली गेली. XBB हे Omicron च्या BA.2.75 आणि BJ.1 प्रकारांच्या संयोजनाने बनलेले आहे. सिंगापूर आणि यूएसमध्ये ऑगस्टमध्ये हे पहिल्यांदा आढळून आले. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की XBB सब व्हेरिएंटने रोग प्रतिकारशक्तीवर मात करण्यास सक्षम आहे,