शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चीन आणि भारतीय सैनिक आमनेसामने, चकमकीचा नवा व्हिडीओ आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 2:19 PM

1 / 6
हा व्हिडीओ चीनच्या साउथ चायना मॉर्निंग पोस्ट (एससीएमपी) या माध्यम संस्थेने ट्विट केला आहे. हा व्हिडिओ केव्हाच आहे, ते अद्याप उघड झालेला नाही, परंतु असा विश्वास आहे की तो मेच्या आधीचा आहे, कारण त्यानंतर दोन्ही देशांनी आपापल्या क्षेत्रात सैनिकांची संख्या वाढविली आहे. (All Photo - Aaj Tak)
2 / 6
एससीएमपीच्या ट्विटनुसार, दोन देशांच्या सैनिकांमध्ये चकमक ज्या ठिकाणी घडली ते ठिकाण गलवान व्हॅली भागातील आहे. कारण गलवान नदी चकमक झालेल्या ठिकाणी स्पष्टपणे दिसते. भारत आणि चीनमधील सैनिक हात-पाय आणि दंडक्याने लढताना दिसतात. काही भारतीय सैनिकांकडेही रायफल आहेत, पण कोणीही ते वापरत असल्याचे दिसत नाही.
3 / 6
चिनी सैनिक लाठी आणि रायट शील्ड (ढाली) घेऊन लढताना दिसत आहेत आणि स्वतःचे रक्षण करीत आहेत. एससीएमपीचा असा दावा आहे की, हा व्हिडिओ 8 सप्टेंबर 2020 रोजी प्रथम ऑनलाइन आला. चीनच्या लष्करी स्रोताने सांगितले की, तो व्हिडीओ काही महिन्यांपूर्वीचे आहे. 15 जून रोजी चिनी सैनिकांशी भारतीय सैनिकांचा वादविवाद झाला तेव्हा चीनचे 20 सैनिक शहीद झाले होते, असे भारताचे म्हणणे आहे.
4 / 6
चीनच्या लष्करी विश्लेषकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर एससीएमपीला सांगितले की, हा व्हिडिओ त्या संघर्षाचा नाही. या विश्लेषकांचा असा विश्वास आहे की, चकमकीत पाहिलेली शस्त्रे पाहता असे दिसते की ते मे 2020 असू शकते. कारण त्यात गलवान नदी दिसते. गलवान नदीजवळ झालेल्या चकमकीनंतर दोन्ही देशांनी आपल्या सैनिकांना बरेच चांगली आधुनिक शस्त्रे पुरविली आहेत.
5 / 6
दरम्यान, अशी माहिती मिळत आहे की पांगोंग तलावाच्या उत्तरेकडील भागावर चिनी सैन्यांची जमवाजमव सुरू झाली आहे. उत्तरेकडील किनाऱ्यावर फिंगर क्षेत्राच्या कड्यावर मोठ्या संख्येने चिनी सैनिक एकत्र येत आहेत. ७ सप्टेंबर रोजी दक्षिणेकडील किना-यावर घुसखोरी करण्याचा अयशस्वी प्रयत्नानंतर ही जमवाजमव सुरु आहे.
6 / 6
बुधवारी संध्याकाळपासून या भागात चिनी सैन्याच्या (पीएलए) हालचाली वाढल्या आहेत. सीमेला लागून असलेल्या पठार भागात चीन लष्करी उपकरणांचा ओघ वाढवत आहे. चीन देशाच्या विविध भागांतून शस्त्रे आणि इतर सैन्य उपकरणे मागवली जात आहेत. भारताच्या लडाख भागात अनेक मोक्याच्या आघाडीवर पुढाकार घेत चीन वारंवार घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत आहे. २९-३० ऑगस्ट ते ८ सप्टेंबरच्या रात्रीपर्यंत असे अनेक प्रयत्न अयशस्वी झाले.
टॅग्स :SoldierसैनिकchinaचीनIndiaभारतBorderसीमारेषा