भारताचा नेपोलियन! 'जनरल झोरावर' २०० वर्षांनी पुन्हा जिवंत होणार; चीनच्या सीमेवर तैनात होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 03:21 PM2022-12-20T15:21:22+5:302022-12-20T15:26:24+5:30

India vs China Army Faceoff: जनरलच्या नावाने दुश्मन सैन्य थराथरा कापत होते. झोरावर हे उंचावरील लढायांमध्ये पारंगत होते.

तवांग सीमेवर चीनच्या सैनिकांची घुसखोरीमुळे एलएसीवर पुन्हा तणाव निर्माण झालेला आहे. यामुळे भारतीय लष्कर चिनी ड्रॅगनला जोरदार झटके देण्याची तयारी करत आहे. अशातच एक महत्वाचे आणि हलका पहाडी भागांत वापरता येणारा रणगाडे लाँच केले जाणार आहेत. भारताचा नेपोलियन म्हणून ज्या जनरल झोरावर सिंग यांची ख्याती होती, त्यांच्या नावाने हे रणगाडे चीनला घाम फोडणार आहेत.

झोरावर हे असे लढवय्ये होते, ज्यांनी पराक्रमाने तिबेटमध्ये चीन-शीख युद्धावेळी अनेक लढाया लढल्या होत्या आणि जिंकल्या होत्या. या जनरलच्या नावाने दुश्मन सैन्य थराथरा कापत होते. झोरावर हे उंचावरील लढायांमध्ये पारंगत होते. याच उद्देशाने बनविलेल्या रणगाड्याला झोरावर नाव देण्यात आले आहे.

झोरावर यांना 'लडाखचा विजेता' म्हणूनही ओळखले जाते. १७८६-१८४१ या काळात त्यांचे नाव जरी ऐकले तरी शत्रू पळून जात असायचा. शत्रू सैन्यानेच त्यांना जनरल ही पदवी दिली होती. तोयाच्या टेकड्यांवर त्यांच्या सहकाऱ्यांनी झोरावर यांच्यावर अंत्यसंस्कार केले होते.

भारतीय लष्कराच्या अत्याधुनिक लाईट टँकचे नाव झोरावर आहे. हे एक आर्मर्ड फायटिंग व्हेईकल (AFV) आहे. या टँकचे आवरण एवढे कठीण आहे की, शस्त्रांच्या आघाताचा परिणाम त्यावर होणार नाही. त्यात बसलेले लोक सुरक्षित राहतात. सोबतच या टँकची मारक क्षमता देखील अत्युच्च आहे. याचबरोबर हा टँक वजनाने हलका आणि इतरांच्या तुलनेत चपळही आहे.

भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) हा रणगाडा बनविला आहे. ही छायाचित्रे DRDO चे डिझाइन मॉडेल आहेत. ते बनवण्याचे काम लार्सन अँड टुर्बोला देण्यात आले आहे. येत्या दोन वर्षांत त्यांचे उत्पादन सुरू होईल. भारतीय लष्कराला अशा 350 रणगाड्यांची गरज आहे. हे टँक केवळ 25 टनांचे असतील. ते चालवण्यासाठी फक्त तीन लोकांची आवश्यकता असेल.

चीनने लडाख सेक्टरमध्ये सीमेच्या बाजूला ZTZ-04A आणि Type-15 लाइट टँक तैनात केल्याची माहिती भारताला मिळाली होती. भारतीय लष्करालाही हलके रणगाडे तैनात करायचे आहेत. भारत रशियाकडून असे रणगाडे खरेदी करणार होता. पण नंतर ते आपल्याच देशातच बनवायचे असे ठरले.

हलके असल्याने ते कुठेही नेले जाऊ शकतात. मुख्य तोफ 120 मिमीची असेल. स्वयंचलित लोडर असेल. एक रिमोट वेपन स्टेशन असेल, ज्यामध्ये 12.7 मिमी हेवी मशीन गन तैनात असेल. परंतू या रणगाड्याची ताकद मोठ्या रणगाड्यांसारखीच असणार आहे.

लाइट टँकमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ड्रोन इंटिग्रेशन, अॅक्टिव्ह प्रोटेक्शन सिस्टीम, उच्च दर्जाची सिचुएशनल अवेयरनेस तंत्रज्ञान असेल. या टँकमध्ये क्षेपणास्त्र डागण्याची देखील सोय असेल. शत्रूचे ड्रोन पाडण्यासाठी वॉर्निंग सिस्टमही असेल. यामुळे लष्करासाठी ते बहुउद्देशीय ठरणार आहेत.