परिस्थिती गंभीर! 'या' राज्यात कोरोनापेक्षा Black Fungus च्या रुग्णांची संख्या जास्त; लोकांचा हलगर्जीपणा कारणीभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 02:48 PM2021-07-14T14:48:39+5:302021-07-14T14:55:59+5:30

Black Fungus : देशात ब्लॅक फंगसचा कहर पाहायला मिळत आहे. सातत्याने वाढणाऱ्या रुग्णसंख्येने प्रशासनाच्या चिंतेत भर टाकली आहे.

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 3,09,46,074 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 38,792 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 624 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,11,408 लोकांना जीव गमवावा लागला आहे.

देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाचा ब्लॅक फंगसचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. देशात ब्लॅक फंगसचा धोका वाढल्याने लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

देशात ब्लॅक फंगसचा कहर पाहायला मिळत आहे. सातत्याने वाढणाऱ्या रुग्णसंख्येने प्रशासनाच्या चिंतेत भर टाकली आहे. याच दरम्यान पुन्हा एकदा धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे.

दिल्लीमध्ये ब्लॅक फंगसने अक्षरश: थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांपेक्षा Black Fungus च्या रुग्णांची संख्या जास्त आहे. मात्र यासाठी लोकांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याची माहिती समोर आली आहे.

रुग्णांनी डॉ़क्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय स्टेरॉईड घेतले आहेत. तसेच घरी ऑक्सिजन सिलिंडरचा देखील वापर केला असल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे ब्लॅक फंगसच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.

अधिकृत आकडेवारीनुसार, दिल्लीमध्ये 6 जुलै रोजी कोरोनाचे 833 सक्रिय रुग्ण होते. तर ब्लॅक फंगसचे 952 रुग्ण आहेत. यातील 402 जणांवर खासगी रुग्णालयात आणि 302 रुग्णांवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दिल्लीमध्ये आतापर्यंत ब्लॅक फंगसचे 1656 रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णालयातील डॉक्टरांनी कोरोनातून बरं झाल्यावर अनेक रुग्णांना ब्लॅक फंगसची लागण झाल्याची माहिती दिली आहे.

ब्लॅक फंगसच्या कित्येक रुग्णांवर सर्जरी करण्यात आली आहे. मात्र अनेकांना त्यामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. रुग्णांची वाढणारी संख्या ही चिंताजनक आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

'ब्लॅक फंगस' म्हणजेच "म्युकोरमायकोसिस" हे एक गंभीर इन्फेक्शन आहे. ज्याचा परिणाम नाक, डोळ्यांवर होतो आणि मेंदूपर्यंतही हे इन्फेक्शन पोहोचतं. या इन्फेक्शनमुळे रुग्णांचे डोळेही काढावे लागत आहेत.

काही राज्यांनी तर वाढत्या रुग्णसंख्येमुळे ब्लॅक फंगसला महामारी घोषित केले आहे. त्यामुळे ब्लॅक फंगसमुळे आधीच कोरोनाच्या भीतीखाली वावरत असलेल्या लोकांची चिंता अधिकच वाढली आहे. हा आजार पसरण्याची वेगवेगळी कारणे तज्ज्ञांकडून सांगितली जात आहेत.

देशभरातील विविध रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अनेकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात करून कोरोनाची लढाई जिंकली आहे पण Black Fungus ने त्यांचं जीवन संपवलं आहे. तब्बल 303 जणांनी आपला जीव गमावला आहे.

कर्नाटकमध्ये कोरोनातून ठिक झाल्यानंतर ब्लॅक फंगसची लागण झालेल्या 303 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामधील 34 टक्के रुग्ण हे बंगळुरूमधील होते.

रुग्णांवर सर्जरी केल्यानंतरही Black Fungus चा पुन्हा धोका असल्याची आता माहिती मिळत आहे. यामुळे डॉक्टरही हैराण झाले असून वेळीच सावध असं सांगण्यात येत आहे. सर्जरीनंतरही ब्लॅक फंगस वेगाने पसरत आहे.

एसएमएस मेडिकल कॉलेजच्या म्युकोरमायकोसिस बोर्डच्या रिसर्चमध्ये याबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. रिसर्चनुसार, एसएमएस रुग्णालयात आतापर्यंत 27 रुग्ण आढळून आलेत ज्यांना सर्जरीनंतर पुन्हा ब्लॅक फंगसची लागण झाली आहे.